शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आले आढळून; उरुळी कांचनमधील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:26 IST

अर्भक टाकणाऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या क्रूर आणि निर्दयी घटनांचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. 

ठळक मुद्देतपासणीनंतर वैदयकीय अधिका-यांनी बाळाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे केले घोषित

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन नजीकच्या शिंदवणे घाट परिसरात दोन दिवस वयाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडलेची घटना ताजी असतानाच, रविवार १७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ - ३० वाजण्याच्या सुमारास डाळिंब रोड परिसरात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अर्भक टाकणाऱ्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या क्रूर आणि निर्दयी घटनांचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाळू घाडगी यांना फोनद्वारे उरुळी कांचन परिसरातील डाळींबकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पुरूष जातीचे अर्भक टाकून दिले असल्याची माहिती दिली.  त्याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सदाशिव गायकवाड, पोलीस हवालदार मेश्राम आदी तात्काळ पोहोचले.

त्यावेळी या पथकाला जनाभाऊ कांचन यांच्या मालकीच्या चाळीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर लाईटच्या डी.पी. जवळ एक बेशुध्द अवस्थेत सदर अर्भक निपचित पडलेले दिसून आले. अर्भकाला पाहून वय समजले नाही. परंतु त्याचे सर्व अवयव तयार झाल्याचे दिसून आले. त्यास रुग्णवाहिकेतून पुणे येथील ससुन रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तपासणीनंतर वैदयकीय अधिका-यांनी बाळाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 पोलिसांनी सदर ठिकाणी जमलेल्या लोकांकडे व आजूबाजूच्या परीसरामध्ये चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली नाही. सदर अर्भक हे मयत झालेले असताना त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावून त्या अर्भकाचा जन्म झाल्याचे उद्देशपुर्वक लपवून ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस हवालदार वसंत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलPuneपुणे