शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया देशातून हद्दपार करणार : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 18:57 IST

देशामध्ये सध्या मंदीचे वातावरण असले तरी औषध निर्माण क्षेत्र चांगली प्रगती करीत आहे.

ठळक मुद्देडेंगी सरकारच्या कार्यक्रमपत्रिकेत अग्रस्थानी

पुणे : पोलिओला देशातून ज्या प्रमाणे हद्दपार केले त्याप्रमाणे मलेरियाला देखील २०२५ पर्यंत हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, देशात डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रोगावर प्राधान्याने काम करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे दिली. सिरम इन्स्टिट्यूटच्या हडपसर येथील नव्या औषध प्रकल्पाचे उद्घाटन डॉ. वर्धन यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, नताशा पूनावाला व डॉ. वर्धन यांच्या पत्नी नूतन गोयल उपस्थित होत्या. डॉ. वर्धन यांनी टेल ऑफ टू ड्रॉप्स या स्वलिखित पुस्तकाची प्रत सायरस आणि अदर पूनावाला या पितापुत्रांना दिली.  डॉ. वर्धन म्हणाले, दिल्लीचा आरोग्यमंत्री असताना १९९३ साली एका वैद्यकीय परिषदेत काही डॉक्टरांनी भारत पोलिओग्रस्तांमधे जगात आघाडीवर असल्याचे सांगितले. तसेच, देशात दिल्ली व दिल्लीमधे माझ्या विधानसभा मतदारसंघात अधिक रुग्ण असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याबाबतची माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेकडून मागविली. तेव्हा ३१ ऑगस्ट १९९३ रोजी पोलिओ निर्मूलनाच्या मोहीमेचा विचार पक्का केला. जागतिक आरोग्य संघटनेने देशाला पोलिओमुक्त घोषित केले. ज्या मोहीमेची सुरुवात माझ्या काळात झाली, त्याचे यश केंद्रीय आरोग्यमंत्री असताना पाहायला मिळाले. मलेरिया आणि डेंगीसारखे रोग आरोग्य विभागाच्या रडारवर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर २०३० पर्यंत मलेरिया हद्दपार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. देशातून २०२५ पर्यंत मलेरिया हद्दपार करण्यात येईल. त्याच बरोबर डेंगी, कुष्टरोग देखील कार्यक्रम पत्रिकेत अग्रभागी आहेत. सर्वच रोग हे काही हद्दपार होणार नाहीत. मात्र, रोग नियंत्रणात ठेवण्याचे काम केले जाईल, असे डॉ. वर्धन यांनी स्पष्ट केले. ---औषध क्षेत्रात मंदी नाही : अदर पूनावालादेशामधे सध्या मंदीचे वातावरण असले तरी औषध निर्माण क्षेत्र चांगली प्रगती करीत आहे. सध्या सिरम इन्स्टिट्यूट दरवर्षाला दीड अब्ज औषधांचे विविध डोस तयार करीत आहे. नवीन औषध प्रकल्पामधे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, अगामी पाच वर्षांत येथे साडेतीन हजार रोजगार निर्माण होतील. तसेच, डोस निर्मितीची क्षमता ५० कोटींनी वाढेल असे अदर पूनावाला यांनी सांगितले.  --सिरमचे डेंगीवरील औषध लवकरच : सायरस पूनावालासिरम इन्स्टिट्यूट तर्फे डेंगीवर औषध तयार करण्यात येत असून, त्याच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे औषध बाजारात येईल, अशी घोषणाच सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी मंगळवारी केली.

टॅग्स :Puneपुणेministerमंत्रीHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार