शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला परिसरातील मल नि:सारण केंद्राचा चेंडू पीएमआरडीएच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:23 IST

शहर सुधारणा समितीला पाणी पुरवठा विभागाने हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येत असल्याचे सूचित केले होते...

ठळक मुद्देप्रमाण वाढले : प्रकल्प पीएमआरडीएने करण्याचा प्रस्ताव धरणसाखळीमध्ये गेल्या काही वर्षात अनेक गावे विकसित

पुणे : खडकवासला धरणसाखळीच्या परिसरात विकसित झालेल्या गावांमधून तसेच नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींमधून धरणाच्या पाण्यामध्ये मैलामिश्रीत पाणी येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने खडकवासला परिसरासाठी स्वतंत्र मलनि:सारण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मान्यता दिली होती. मात्र, हा सर्व परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येत असल्याने हा प्रकल्प पीएमआरडीएनेच करावा, असे पत्र पालिकेने दिलेले असल्याने या प्रकल्पाचे नेमके होणार काय असा प्रश्न आहे. शहर सुधारणा समितीला पाणी पुरवठा विभागाने हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येत असल्याचे सूचित केले होते. मात्र, तरीही समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली. मान्यता देताना प्रकल्पाचा खर्च राज्य शासन आणि पालिकेने समान विभागून करावा असाही प्रस्ताव यावेळी मांडला होता. पुणे शहराला खडकवासला प्रकल्पामधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणामधील गाळ काढण्याचा विषय चर्चेत आलेला होता. या धरणसाखळीमध्ये गेल्या काही वर्षात अनेक गावे विकसित झाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर नविन इमारती उभ्या राहात आहेत. याभागात २५ हजार लोकसंख्या झाली आहे. त्यातील सांडपाणी आणि मैलामिश्रीत पाणी धरणामध्ये येऊ लागले आहे. याबाबत जलसंपदा विभागाने पालिकेला यापूर्वीच पत्रही दिलेले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करुन शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढत आहे. या क्लोरीनमुळे नागरिकांना दात ठिसूळ होणे आदी आजार जडू लागले आहेत. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेमधील क्लोरीनचे प्रमाण कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा आणि त्यासाठीचा खर्च राज्य शासन व महापालिकेने विभागून करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. हा प्रस्ताव मांडून दोन महिने उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मुळातच हा पालिकेच्या हद्दीबाहेरील गावांसाठी असलेला प्रकल्प असल्याने तो पीएमआरडीएने उभारावा असे स्पष्ट मत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केलेले आहे. त्यामुळे प्रकल्प होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका