कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती वाडेबोल्हाईला करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:42+5:302021-02-05T05:20:42+5:30

वाघोली : वाघोली येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती म्हणून वाडेबोल्हाई येथे व्हावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय ...

Make Wadebolhai a sub-market committee of the Agricultural Produce Market Committee | कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती वाडेबोल्हाईला करा

कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती वाडेबोल्हाईला करा

वाघोली : वाघोली येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती म्हणून वाडेबोल्हाई येथे व्हावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय जनहित परिषदच्या वतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रीय जनहित परिषदच्या वतीने परिषेदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोलते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या वेळी शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा म्हणून स्वामिनाथन आयोग कायद्याची अंमलबजावणी करून हा कायदा त्वरित लागू करावा. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परिषदेला संघटनेने पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्याच्या हिताचा जो कायदा आहे. तो गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना समजावून सांगून शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनहित परिषदेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोलते, उपाध्यक्ष तुकाराम पाटील, माजी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र कंद, तुकाराम जाधव, शहाजी आव्हाळे, डॉ. सई पाटील, कुशाभाऊ गावडे, जान महंमद पठाण, तसेच

परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

फोटो : वाघोली येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती म्हणून वाडेबोल्हाई येथे करण्याची मागणी राष्ट्रीय जनहित परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Make Wadebolhai a sub-market committee of the Agricultural Produce Market Committee