शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करा ; पुण्यातील मानवधिकार कार्यकर्त्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 17:28 IST

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अहमदनगरमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समाेर आल्या असून राज्यात सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य महिला आयाेग तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयाेग यांना निवेदन दिले आहे. तसेच अहमदनगर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील केली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये ऑनर किलिंगच्या घटना समाेर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर शिंदे यांनी निवेदन दिले आहे. 28 मार्च राेजी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन 11 वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीची तिच्या वडीलांनी आणि मामाने मिळून निर्दयीपणे हत्या केली हाेती. तसेच हत्या करुन घराजवळच असलेल्या शेत तळ्याच्या बाजुला राॅकेल टाकून तिचा मृतदेह जाळला हाेता. या घटनेनंंतरच पंधराच दिवसात नेवासा तालुक्यातील काैठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पीडीत मुलीच्या पालकांनी तिला लग्न लावून देताे म्हणून बाेलावून तिचा खून केला. 

एका महिन्यात दाेन ऑनर किलींग झालेले असताना हे थांबविण्यासाठी सरकारकडून काेणतीही प्रतिक्रिया आली नसल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2004 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेमध्ये सन्मानाच्या नावाखाली महिलांविरुद्ध हाेणारे गुन्हे राेखण्यासाठी एक ठराव पास करण्यात आला व त्या ठरावानुसार प्रत्येक सदस्य राष्ट्राने अशा प्रकारचे गुन्हे राेखण्यासाठी विशेष कायदे करावेत, प्रशासकीय पातळीवर कृती आराखडे तयार करण्याबाबत ठरविण्यात आले आहे. आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचा विसर पडला असल्याचे शिंदे यांनी निवदेनात नमूद केले आहे. 

शिंदे म्हणाले, ऑनर किलींग राेखण्यासाठी सरकारने पाॅस्काे सारखा विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा ऑनर किलींगच्या घटना घडू शकते याची माहिती गावातील ग्रापपंचायत सदस्य, सरपंच यांना माहित असते. परंतु अनेकदा याबाबत पाेलिसांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे ऑनर किलींगसाठी विशेष कायदा करुन त्यात अशा घटना राेखण्याची जबाबदारी सरपंच, ग्रापपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना नेमून द्यायला हवी. तसेच प्रत्येक पाेलीस स्टेशनमध्ये समुपदेशन कक्ष उभारण्यात यावा. जिथे मुला -मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. अनेकदा प्रेमविवाहामध्ये गावामध्ये इज्जत जाईल या भावनेतून ऑनर किलींगच्या घटना घडतात. परंतु जर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच जर या विराेधात पुढे आल्या तर अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे असा कायदा करणे आवश्यक आहे. त्याचबराेबर एक हेल्पलाईन सुरु करणे सुद्धा आवश्यक आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयMurderखून