फसवणूक झाल्याने भरपाई द्या

By Admin | Updated: January 20, 2015 00:48 IST2015-01-20T00:48:14+5:302015-01-20T00:48:14+5:30

बँकाना ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे.

Make payment due to fraud | फसवणूक झाल्याने भरपाई द्या

फसवणूक झाल्याने भरपाई द्या

पुणे : आॅनलाईन बँकिंगद्वारे पुण्यातील एका कंपनीची ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधित रक्कम हस्तांतरित झालेल्या बँकाना ४४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे. सुरक्षेसाठी बँकांना घालून दिलेले केवायसी नॉर्म पाळण्याची वेळीच काळजी न घेतल्याने तसेच वोडाफोन कंपनीने नवे सिमकार्ड देतानाही कागदपत्रांची पाहणी न केल्याचा बँक व सिमकार्ड कंपनीला भुर्दंड बसला आहे.
या प्रकरणी धनलक्ष्मी बँकेने १८ लाख, एसबीआय बँकेने २ लाख, एसबीआय पटियाला बँकेने ७.५ लाख, पंजाब नॅशनल बँकेने ७ लाख आणि वोडाफोन कंपनीने फिर्यादीला १० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा निकाल देण्यात आला आहे. याप्रकरणी सुहास एंटरप्रायझेसतर्फे सुहास मानकामे यांनी फिर्याद दाखल केली होती. फियार्दीतर्फे अ‍ॅड. गौरव जाचक यांनी माहिती तंत्रज्ञान सचिवांपुढे दावा दाखल केला होता.
सुहास एंटरप्रायझेसचे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये एक कोटी रुपयांचे कॅश क्रेडीट अकाऊंट होते. आॅनलाईन बँकिंगद्वारे फसवणूक करून त्यांच्या खात्यातून ७९ लाख २७ हजार रुपये काढून घेण्यात आले होते. त्यातील ३१ लाख २६ हजार रुपयांची रक्कम बँकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर लगेच गोठविण्यात आली होती.
फिर्यादी यांच्या खात्यातून फसवून काढून घेण्यात आलेली रक्कम जयपूर, लखनौ, गाझियाबाद येथील बँकांमध्ये वर्ग झाली होती.
(प्रतिनिधी)

४फसवणूक करून काढून घेण्यात आलेली रक्कम परत मिळावी म्हणून फिर्यादी यांनी दावा दाखल केला होता. बँकेने फियार्दीच्या खात्यातून रक्कमेच्या सुरक्षेसाठी बँकांना घालून दिलेले केवायसी नॉर्मस पाळले नाहीत. तसेच वोडाफोन कंपनीने नवे सिमकार्ड देताना कागदपत्रांची पाहणी केली नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. जाचक यांनी केला.

Web Title: Make payment due to fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.