‘मेक इन महाराष्ट्र’ला पीएमआरडीएची साथ
By Admin | Updated: February 14, 2016 03:23 IST2016-02-14T03:23:54+5:302016-02-14T03:23:54+5:30
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वतीने स्वतंत्र ‘ई-गव्हर्नन्स’ प्रणाली विकसित करण्यात येत असून, या अंतर्गत विथ इज आॅफ डुर्ईंग बिझनेसच्या दृष्टीने

‘मेक इन महाराष्ट्र’ला पीएमआरडीएची साथ
पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वतीने स्वतंत्र ‘ई-गव्हर्नन्स’ प्रणाली विकसित करण्यात येत असून, या अंतर्गत विथ इज आॅफ डुर्ईंग बिझनेसच्या दृष्टीने उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पीएमआरडीएच्या हद्दीत वाढ होऊन तब्बल ६ हजार ७०० चौरस किलोमीटर झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील चाकण, राजंणगाव, हिंजेवाडी, तळेगाव या सर्व प्रमुख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) चे क्षेत्र पीएमआरडीए आले आहेत. कायद्यामुळे या क्षेत्रातील उद्योगांना व नव्याने उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देण्याचे अधिकार पीएमआरडीएकडे आले आहेत. त्यामुळेच ‘मेक इन महाराष्ट्रा’साठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. यामध्ये पीएमआरडीएच्या क्षेत्रात नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या, रेल्वे, विद्युत महामंडळ, पांटबंधारे, पर्यावरण विभाग यांसारख्या अनेक विभागाच्या एनओसी घ्यावे लागते. तसेच प्रचंड वेळदेखील खर्च येतो. यामुळेच पीएमआरडीच्या वतीने ई-गव्हर्नन्स अतंर्गत स्वंतत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार असून, एनओसी, बांधकाम परवानगी अन्य सर्व प्रक्रिया सुटसुटीत करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महानगर आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले.
याबाबत झगडे यांनी सांगितले, की इज आॅफ डुर्इंग बिझनेसच्या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमधील किचकटपणा व कालापव्यय दूर करणे, फॅक्टरी प्लॅन मंजुरी, धोकादायक उद्योगासह अन्य उद्योगासाठी घ्याव्या लागणाऱ्या किचकट एनओसी त्वरित व एकाच ठिकाणी पीएमआरडीएच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.