विकासासाठी परिवर्तन घडवा
By Admin | Updated: February 15, 2017 02:20 IST2017-02-15T02:20:01+5:302017-02-15T02:20:01+5:30
प्रभाग क्रमांक ४० मधील मतदारांनी परिवर्तनाचे शिल्पकार व्हावे, असे आवाहन आमदार भीमराव तापकीर यांनी प्रभाग ४० मध्ये झालेल्या

विकासासाठी परिवर्तन घडवा
कात्रज : प्रभाग क्रमांक ४० मधील मतदारांनी परिवर्तनाचे शिल्पकार व्हावे, असे आवाहन आमदार भीमराव तापकीर यांनी प्रभाग ४० मध्ये झालेल्या कोपरा सभेत केले. प्रभाग ४० आंबेगाव-दत्तनगर-कात्रज गावठाणमधील भाजपाचे अधिकृत उमेदवार अभिजित कदम, संदीप बेलदरे पाटील, सुनीता लिपाणे - राजवाडे, स्वप्नाली जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत तापकीर बोलत होते.
भाजपातर्फे कोपरा सभा घेण्यावर भर देण्यात आला असून मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे. विजयासाठी भाजपा कार्यकर्ते सरसावले आहेत. या वेळी बोलतांना विद्यमान नगरसेवक अभिजित कदम म्हणाले, की मी विधायक दृष्टिकोन समोर ठेवून काम करीत असताना प्रभागातील नागरिकांनी सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
उमेदवार संदीप बेलदरे पाटील म्हणाले, की भारतीय जनता पक्षाने देशात आणि राज्यात परिवर्तन घडविले आहे. महापालिकेतही येथील जनता नक्की परिवर्तन घडवेल.
या वेळी डॉ. संजय यादव, शिवाजी रेणुसे, सुधीर निवंगुणे, चंद्रकांत गाडे, युवराज जगताप, सागर कदम, छायाताई सायकर, राजू कदम, श्रीकांत लिपाणे, नानासाहेब बेलदरे, सचिन पवार, अतुल फाले, आतिष जाधव यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(वार्ताहर)