शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बहुमत आमचेच! दोन्ही पक्षांचा दावा, इंदापूर तालुका : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा दावा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:08 IST

इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी १७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. हे हेवेदावे वगळता या दोन्ही पक्षांची प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता आल्याचे दिसून येत आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी १७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. हे हेवेदावे वगळता या दोन्ही पक्षांची प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता आल्याचे दिसून येत आहे.या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असणाºया बिजवडी ग्रामपंचायतीच्या दहा जागा काँग्रेसने जिंकून देखील सरपंचपदाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्याने काँग्रेसची ग्रामपंचायतीवरील सत्ता गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचेजिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांचे गाव असणाºया हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५ जागा जिंकून काँग्रेसचे शरददेवकर यांच्या अधिपत्याखालील पॅनलने ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली.रेडणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भीमराव काळे अपक्ष म्हणून विजयी झाले. ते मूळचे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते. पण स्थानिक कारणावरून त्यांचे व हर्षवर्धन पाटील यांचे संबंध ताणले गेले. लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमंत ढोले यांनी आपली सत्ता कायम ठंवली. ठेवताना त्याचे जुने सहकारी भाजपवासी प्रभाकर खाडे व नेहेमीचे प्रतिस्पर्धी तानाजी नाईक यांच्या पॅनलला नेस्तनाबूत केले. या ग्रामपंचायतीवर ढोले यांचीच सत्ता होती. मागील काळात त्यांचे सहकारी प्रभाकर खाडे भाजपामध्ये गेले. मात्र मजबूत संख्याबळ असल्याने ढोले यांची सत्ता तरली.डाळज नं.१, कुरवली, पिंपरी शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायत, रेडणी, थोरातवाडी, हिंगणगाव व बिनविरोध झालेल्या पडस्थळ, झगडेवाडी,गंगावळण या नऊ ग्रामपंचायतींवर दोन्ही पक्षांनी आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे.या खेरीज बेलवाडी, बिजवडी, बोरी, डाळज नं. ३, जांब, मदनवाडी, न्हावी, म्हसोबाची वाडी, सराटी या ९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर अजोती सुगाव ग्रुप ग्रामपंचायत, डिकसळ, कळाशी, लाखेवाडी, माळवाडी, मानकरवाडी, रणमोडवाडी या ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आल्याचे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे