मैथिली आडकर, संदीप बर्वे यांना रमाई रत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:10 IST2021-05-24T04:10:52+5:302021-05-24T04:10:52+5:30

पुणेः- महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा रमाई रत्न पुरस्कार ...

Maithili Aadkar, Ramai Ratna Award to Sandeep Barve | मैथिली आडकर, संदीप बर्वे यांना रमाई रत्न पुरस्कार

मैथिली आडकर, संदीप बर्वे यांना रमाई रत्न पुरस्कार

पुणेः- महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा रमाई रत्न पुरस्कार मैथिली प्रमोद आडकर आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप बर्वे यांना जाहीर झाला आहे, स्मृतिचिन्ह, पंचशील शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे निमंत्रक विठ्ठल गायकवाड यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

बुधवार दि.२६ मे रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते घरगुती छोटेखानी कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे भूषविणार असून, नगरसेविका लता राजगुरु स्वागताध्यक्ष आहेत. कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर उपस्थित राहणार आहेत.

-------------------------------------------

Web Title: Maithili Aadkar, Ramai Ratna Award to Sandeep Barve