विकासकामे गतीने पूर्ण करण्याबरोबरच दर्जा राखा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:20+5:302021-02-05T05:12:20+5:30

बारामती : तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करा. तसेच विकासकामांचा दर्जा राखा. गुणवत्तापूर्ण काम होते ...

Maintain quality along with speedy completion of development works: Ajit Pawar | विकासकामे गतीने पूर्ण करण्याबरोबरच दर्जा राखा : अजित पवार

विकासकामे गतीने पूर्ण करण्याबरोबरच दर्जा राखा : अजित पवार

बारामती : तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करा. तसेच विकासकामांचा दर्जा राखा. गुणवत्तापूर्ण काम होते का नाही याकडे लक्ष द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

बारामती तालुक्यातील विविध विकासकामांबाबतची आढावा बैठक रविवारी (दि. २४) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागांतील अधिकाऱ्यांकडून बारामती शहरातील तसेच तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार करावीत, कामे वेळेत करावीत, कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामात दुर्लक्ष करू नये, आवश्यक त्या ठिकाणी वन विभागाची परवानगी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंबाचीवाडी येथील सुशोभित केलेल्या पाझर तालावास भेट दिली. सुशोभित केलेल्या पाझरतलावाचे काम पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. पाझरतलावाच्या सभोवती ओपन जिम आणि प्ले ग्राउंड तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या ‘आयटीआय’ इमारतीच्या कामाची पाहणी त्यांनी केली. सुपे येथील नियोजित मार्केट, पोलीस स्टेशनच्या जागेची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी यांना सूचना दिल्या, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय व विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या इमारतीच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव, संभाजी होळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

—————————————

बारामती तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

२५०१२०२१-बारामती-०१

२५०१२०२१-बारामती-०२

—————————————

Web Title: Maintain quality along with speedy completion of development works: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.