शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपीस तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 19:38 IST

आरोपीची दृष्टी कायमची जाऊ नये यासाठी वैद्यकीय उपचार मिळणे हा त्याचा नैसर्गिक अधिकार असून त्यास तात्पुरता जामीन

ठळक मुद्देआरोपीस तुरुंगातुन सुटका झाल्यापासून १ महिन्याकरिता तात्पुरता जामीन मंजूर

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जाधव यास हृदयरोग असून मधुमेहाचा देखील त्रास आहे. आरोपीचे डोळ्याचे कॅटरॅक्ट ऑपरेशन करावयाचे असल्याने व त्यास योग्य तो वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यास कायमचे अंधत्व येऊ शकते, अशी बाजू न्यायालयात मांडण्यात आली. तसेच आरोपीची दृष्टी कायमची जाऊ नये यासाठी त्यास वैद्यकीय उपचार मिळणे हा त्याचा नैसर्गिक अधिकार असून त्यास तात्पुरता जामीन देण्याची विनंती न्यायालयास करण्यात आली. त्यावेळी न्यायालयास तात्पुरता जामीन देण्याचे अधिकार असल्याचे नमूद करत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी न्यायालयाने आरोपीस तुरुंगातुन सुटका झाल्यापासून १ महिन्याकरिता तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तसेच ५०,००० हजार रुपयांचे जात मुचलक्यावर आणि एक महिन्याच्या अवधीनंतर सरेंडर होण्याचे व लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत न जाण्याचे अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.लोंढे याचा कट रचून खून केल्याप्रकरणी त्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संदर्भात पोलिसांनी एकूण 15 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा असा अर्ज जाधव याच्यातर्फे त्याचे वकील ?ड. विजयसिंह ठोंबरे व ?ड. संदीप बाली यांनी दाखल केला होता.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCourtन्यायालय