मुख्य आरोपी दोन वर्षांनंतरही मोकाटच

By Admin | Updated: February 17, 2017 04:57 IST2017-02-17T04:57:42+5:302017-02-17T04:57:42+5:30

वघ्या महाराष्ट्राला हेलावून सोडलेल्या येथील कुमार रिसॉर्ट येथील अल्पवयीन बालिका अपहरण, बलात्कार व खून प्रकरणाला

The main accused even after two years | मुख्य आरोपी दोन वर्षांनंतरही मोकाटच

मुख्य आरोपी दोन वर्षांनंतरही मोकाटच

लोणावळा : अवघ्या महाराष्ट्राला हेलावून सोडलेल्या येथील कुमार रिसॉर्ट येथील अल्पवयीन बालिका अपहरण, बलात्कार व खून प्रकरणाला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली. मात्र, या घटनेचा मुख्य आरोपी अजूनही मोकाटच असल्याने या बालिकेचे आई-वडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
कुमार रिसॉर्ट या हॉटेलमध्ये १५ फेब्रुवारी २०१५ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव, ता. इंदापूर येथे राहणारे छगन चंपालाल जैन सात वर्षांच्या मुलीसह गावातील एका लग्नसमारंभासाठी आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास रिसॉर्टच्या मॅरेज लॉन परिसरातून आयेशा जैन या सातवर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. पुढे तपासात दोन दिवसांनी १७ फेब्रुवारी रोजी रिसॉर्टच्या टेरेसवरील सोलर पॅनलजवळ आयेशाचा मृतदेह मिळून आला. बलात्कार करून नंतर गळा चिरत तिचा खून करण्यात आला असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाले होते. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर संतप्त झालेले मुलीचे नातेवाईक व लोणावळ्यातील ग्रामस्थ यांनी लोणावळा बंद पुकारत तीव्र आंदोलन केले होते.
मोर्चाला हिंसक वळण लागल्याने रिसॉर्टची आंदोलकांनी तोडफोड केली होती. सदर घटना माध्यमांमधून वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने राज्यभरात सर्वत्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पर्यटननगरी लोणावळा शहर या घटनेमुळे काही काळ अस्थिर झाले होते. या घटनेचे गंभीर परिणाम येथील अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष रॉय हा वेश बदलून लोणावळ्यातून फरार झाल्याने तो पोलिसांच्या हाती न लागल्याने शहरात मोर्चा, आंदोलन या मार्गांनी महिनाभर निषेध सुरूच होते. अखेर राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री गिरीष बापट आदी नेत्यांनी लोणावळ्यात येत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते.
मात्र, शहर शांत होण्याचे नाव घेत नव्हते. याप्रकरणी मुख्य आरोपी रॉय याला मदत करणारा सहआरोपी अजय दोदाड याला अटक करत त्याची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली होती. (वार्ताहर)

Web Title: The main accused even after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.