मोलकरणीचा ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST2021-05-10T04:10:57+5:302021-05-10T04:10:57+5:30
पुणे : घरमालकाची नजर चुकवून मोलकरणीने ३ लाख ९० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना कल्याणीनगरमधील पिकॉक पॅलेस ...

मोलकरणीचा ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
पुणे : घरमालकाची नजर चुकवून मोलकरणीने ३ लाख ९० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना कल्याणीनगरमधील पिकॉक पॅलेस येथे २८ एप्रिल रोजी घडली होती.
या प्रकरणी संदीप ठुसू (वय ३३, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. संदीप व त्यांची पत्नी २८ एप्रिल रोजी सायंकाळी घराचे हॉलमध्ये बसलेले असताना त्यांच्याकडे घरकाम करणा-या महिलेने काम करीत असताना त्यांची नजर चुकवून घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले ३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचे ९७ ग्रॅम सोन्याचे व १५ ग्रॅम चांदीचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी संदीप यांचा माेलकरणीवर संशय असून पोलिसांनी सुनिता लष्करे (वय ३३, रा. कल्याणीनगर) यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे अधिक तपास करीत आहेत.