घरकुलाजवळील दारूअड्डा गायब
By Admin | Updated: February 23, 2015 00:22 IST2015-02-23T00:22:52+5:302015-02-23T00:22:52+5:30
शहरात ठिकठिकाणी खुलेआम होत असलेली बेकायदा दारूविक्री यावर आधारित ‘बिनधास्त ढोसा अड्ड्यावर दारू’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची

घरकुलाजवळील दारूअड्डा गायब
पिंपरी : शहरात ठिकठिकाणी खुलेआम होत असलेली बेकायदा दारूविक्री यावर आधारित ‘बिनधास्त ढोसा अड्ड्यावर दारू’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची रविवारी शहरभर चर्चा होती. दारूविक्रेत्यांसह पोलिसांनी या वृत्ताची धास्ती घेतल्याने चिखली, स्पाईन रोडवरील घरकुल प्रकल्पाजवळ खुलेआम सुरू असलेला दारुअड्डा रविवारी अचानक गायब झाला.
चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, भोसरी उड्डाणपूल, निगडी, कुदळवाडी रस्ता, पूर्णानगर यासह शहरभर तळीरामांचे अड्डे सुरू आहेत. चायनीज पदार्थांच्या स्टॉलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदारीत्या दारूविक्री सुरू आहे. याकडे पोलिसांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असून, त्याबाबतचे सचित्र ‘स्टिंग आॅपरेशन’ लोकमतच्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. शहरात दिवसभर या वृत्ताची चर्चा होती. खुलेआम सुरू असलेल्या दारूविक्रीबाबत अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करीत पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली.
रविवारी सकाळीच येऊन पोलिसांनी येऊन हा अड्डा बंद केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, कारवाईबाबत निगडी पोलीस
ठाण्यात चौकशी केली असता पोलिसांनी कानावर हात ठेवले. शहरातील चायनीज हातगाड्यांवरील दारूविक्री बंद झाली; तसेच रस्त्यावर खुलेआम बसणारे तळीराम नजरेस पडत नव्हते. (प्रतिनिधी)