महुडे बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:43+5:302021-01-08T04:31:43+5:30
भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीनबापू दामगुडे व राष्ट्रवादीचे सरचिटणीस रवींद्र बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली महुडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ९ पैकी ...

महुडे बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध
भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीनबापू दामगुडे व राष्ट्रवादीचे सरचिटणीस रवींद्र बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली महुडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ९ पैकी ८ जागा बिनविरोध केल्या असून, एक जागा रिक्त राहिली आहे. यामुळे मागील वीस वर्षांपासून गावात असलेला वादविवाद मिटला आहे. गावात गावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिराचे काम सुरू आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत.
महुडे बुद्रुक ग्रामपंचायतीत मगील वीस वर्षांपासून निवडणुका होत होत्या. त्यामुळे गावात राजकीय वातावरण तापून गावात दर वेळी वादविवाद होत होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन नितीन दामगुडे व रवींद्र बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत बिनविरोध केली. यासाठी नथू दामगुडे, अंकुश दामगुडे, बापू पिलाणे, मारुती पिलाणे, संपत दामगुडे, धोंडिबा दामगुडे, रमेश बांदल, रघुनाथ पिलाणे, अंकुश पिलाणे, बाळासो बांदल, पंढरी दामगुडे, बाबा तावरे, दीपक दामगुडे यांनी विशेष सहकार्य केले.
--
चौकट
बिनविरोध निवडून आलेले सदस्य असे
प्रभाग क्रमांक एक प्रदीप तानाजी दामगुडे, प्रेमा पांडुरंग दामगुडे, प्रभाग क्रमांक २ रामचंद्र गेनबा दामगुडे, प्रियांका रामदास दामगुडे, मंदा दशरथ दामगुडे. प्रभाग क्रमांक ३ संजय आनंदा सुतार, पूनम जितेंद्र बांदल, महेंद्र वाघू गायकवाड.
-०६भोर-महुडे ग्रामपंचायती बिनविरोध
--