शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विकासात महामेट्रोला हवाय वाटा; पुणे महापालिकेकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 02:10 IST

मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला दिलेल्या वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे (एफएसआय) महापालिकेला मिळणाऱ्या वाढीव विकासनिधीतील अर्धी रक्कम महामेट्रोला द्यावी असा प्रस्तावच सरकार व महापालिकेला पाठवला आहे.

- राजू इनामदार पुणे : मेट्रोमुळे होणाऱ्या शहराच्या विकासात महामेट्रो कंपनीला वाटा हवा आहे. मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला दिलेल्या वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे (एफएसआय) महापालिकेला मिळणाऱ्या वाढीव विकासनिधीतील अर्धी रक्कम महामेट्रोला द्यावी असा प्रस्तावच सरकार व महापालिकेला पाठवला आहे. सरकारला यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये सध्या मेट्रो चे काम सुरू आहे. पुण्यात मेट्रो च्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. मेट्रो ला प्रवासी मिळावेत यासाठी शहराची वाढ आडवी न करता उभी करण्याचा विचार झाला आहे. त्यातूनच मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटर अंतरापर्यंत ४ एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरात उंच इमारती उभ्या राहणार असून त्यासाठी द्याव्या लागणाºया परवानगीमधून महापालिकेला विकासनिधी म्हणून कोट्यवधी रूपये मिळणार आहेत.हा वाढीव निधी केवळ मेट्रोमुळे मिळणार असल्याचा महामेट्रोचा दावा आहे. मेट्रो ची निर्मिती शहराच्या विकासासाठीच झाली आहे. त्यामुळे या विकासातून मिळणाºया निधीत महामेट्रोला वाटा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मेट्रो चा प्रकल्प कोट्यवधी रूपयांचा असतो. त्यासाठी देशीपरदेशी वित्तीय संस्थांकडून व्याजाने अर्थसाह्य घेण्यात येते. महामेट्रो कंपनीचे उत्पन्नाचे साधन मेट्रो व त्यातून मिळणाºया जाहिराती इतकेच मर्यादीत आहे. कोट्यवधी रूपयांचे प्रकल्प उभे करणाºया कंपनीची आर्थिक स्थितीही भक्कम असण्याची गरज आहे. त्यामुळेच ज्या शहरांमध्ये मेट्रो सुरू केली जाणार आहे, त्या शहरांनी मेट्रो मुळे होणाºया विकासात महामेट्रोला वाटा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. महामेट्रो ने तसे पत्रच राज्य सरकार व महापालिकांना पाठवले आहे.नागपूर महापालिकेने असा वाटा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी शनिवारी सुचितही केली. ५० टक्के वाटा देण्यास नागपूर महापालिकेने संमती दिली असे त्यांचे म्हणणे आहे, मात्र एकट्या महापालिकेने अशी संमती देऊन चालणार नाही, याबाबत सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल असे पालिका अधिकाºयांचे म्हणणे आहे.पीएमआरडीएचीही मागणीशिवाजीनगर ते हिंजवडी अशी मेट्रो पीएमआरडीए (पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) कडून करण्यात येत आहे. त्यांनी हे काम पीपीपी (पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांनीही पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेकडे वाढीव विकास निधीत वाटा द्यावा अशी मागणी केली आहे. मेट्रोमुळे शहराचा विकास होत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने ही जबाबदारी घेतलीच पाहिजे असे पीएमआरडीएचे म्हणणे आहे.वाहतूकीची सातत्याने होणारी कोंडी टाळण्यासाठी मेट्रो निर्माण होत आहे. वाढीव बांधकाम होणार आहे, मात्र त्यातून मिळणारा निधी महामेट्रोला द्यायचा किंवा नाही याबाबत सरकारला निर्णय घ्यावे लागेल.- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेतेमहापालिकेला आर्थिकदृष्ट्या अपंग करण्याचा सरकारचा कार्यक्रमसुरू आहे. महामेट्रोला वित्तीय कंपन्यांनी कोट्यवधीचे कर्ज दिले आहे, त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नावर डोळा ठेवू नये.- चेतन तुपे, विरोधी पक्षनेतेमहामेट्रो ही काही व्यावसायिक कंपनी नाही. नफ्यासाठी तिची स्थापना झालेली नाही, मात्र कंपनी असल्यामुळे स्वत:चे आर्थिक भागभांडवल असणे गरजेचे आहे. मेट्रोमुळे शहरांची वाढ होणार आहे ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे त्यातून मिळणाºया निधीत महामेट्रो ला वाटा देणे काहीच गैर नाही. नागपूर महापालिकेने असे करण्यास संमती दिली आहे. - ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे