ग्रामपंचायतीवर महिलाराज
By Admin | Updated: February 2, 2015 02:22 IST2015-02-02T02:22:13+5:302015-02-02T02:22:13+5:30
भोर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यावर त्यावर ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती

ग्रामपंचायतीवर महिलाराज
भोर : भोर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यावर त्यावर ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेण्याची मुदत असल्याचे तहसीलदार राम चोबे यांनी सांगितले. आरक्षण सोडतीत जास्तीतजास्त जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत, यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते डिसेंबर २०१५पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीला २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्याप्रमाणे २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रभाग रचना व आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यावर ५ फे ब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या हरकतींवर ९ फेब्रुवारी रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. तर १३ फेब्रुवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
भोर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिल
ते मेदरम्यान होण्याची शक्यता
आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर प्रथमच निवडणूक होत असल्याने सुमारे ७४ ग्रामपंचायतींवर आरक्षणात ५० टक्के महिलांना संधी मिळाली असल्याने या ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे. यामुळे अनेक गावांतील कार्यकर्त्यांच्या जागेवर आरक्षण पडणार आहे. सर्वसाधारण गटाच्या जागा कमी होणार असल्याने अनेक विद्यमान सरपंचांसह मोठ्या नेत्यांची संधी हुकणार आहे. (वार्ताहर)