शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुण्यात रंगला 'लोकमत स्वर चैतन्य' दिवाळी पहाटचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 12:29 IST

राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली.

पुणे - दिव्यांच्या तेजाने लखलखलेल्या दाही दिशा... धुक्याने लपेटून घेतलेली सृष्टी... पाखरांचा मधुर किलबिलाट... मनाला प्रफुल्लित आणि सुखावून टाकणारा हवेतील गारवा... अन् सप्तसुरांनी मोहून गेलेला आसमंत अशा मंतरलेल्या वातावरणात सोमवारी रसिकांची पहाट 'स्वरचैतन्या' ने बहरली. राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली. राकेश चौरसिया यांची बासरी आणि महेश काळे यांच्या गायन जुगलबंदीने उत्तरार्धात कळस गाठला. निमित्त होते, युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने आयोजित 'लोकमत स्वर चैतन्य'  दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. कार्यक्रम स्थळी पाय ठेवायला देखील जागा नव्हती. इतकी रसिकांची कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी झाली होती.

आंतराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ बासरीवादक गुरू पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी निर्मित केलेल्या 'प्रभातेश्वरी' रागापासून राकेश चौरसिया यांनी मैफलीला प्रारंभ केला. वेणूवर लीलया फिरणाऱ्या जादुई बोटांनी रसिकांवर मोहिनी घातली. बासरीच्या मोहक सुरांनी अवघे वातावरण 'गोकुळमय' झाले. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे चिरंजीव पं. सत्यजित तळवलकर यांच्या तबल्यावरील हुकूमतीने रसिकांना जिंकले. राकेश चौरसिया आणि पं. तळवलकर यांनी अप्रतिम जुगलबंदीने मैफिल खिळवून ठेवली. त्यानंतर महेश काळे यांचे मंचावर आगमन होताच रसिकानी टाळ्यांचा कडकडाट केला. भूपाल तोडी रागाने मैफलीचा श्रीगणेशा करीत 'कैसे रिजाऊ' ही बंदिश त्यांनी खुलवली. 

पं. जितेंद्र अभिषेकी यांनी प्रथमच संगीत दिग्दर्शित केलेल्या ' संगीत मत्स्यगंधा'  नाटकातील 'अर्थशून्य भासे' या पदापासून 'गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी', 'दिवस मावळता धाव किनाऱ्याशी', 'तव अंतरा झाला मन रमता मोहना', 'साद देती हिमशिखरे', ' या तिथे जाता संगम तो सारितांचा', 'गुंतता ह्र्दय हे', 'देवाघरचे ज्ञात कुणाला' अशी नाट्यपदांची मालिका त्यांनी सादर केली. रसिकांच्या फर्माईशीनंतर 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'मन मंदिरा तेजाने' आणि 'अबीर गुलाल'चे बहारदार सादरीकरण करून महेश काळे यांनी रसिकांची मने जिंकली. मैफलीच्या उत्तरार्धात राकेश चौरसिया आणि महेश काळे यांच्या गायन जुगलबंदीने कळससाध्य गाठला. 'पायोजी मैने रामरतन धन पायो' च्या सादरीकरणात शब्द नि सुरांचा अनोखा संगम रसिकांनी अनुभवला. 'सूर निरागस हो' च्या नाट्यपदाने मैफलीची सांगता झाली. 

 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतDiwaliदिवाळी