शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

‘महावितरण अभय योजने’त होणार;४० हजार प्रकरणांची तडजोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:19 IST

‘महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत दाखलपूर्व ४० हजारांहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत

वडगाव मावळ : जिल्ह्यात शनिवारी (दि. १४) आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीज चोरीच्या १२२ तर ‘महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत दाखलपूर्व ४० हजारांहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणामार्फत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीज चोरी आणि थकबाकीची प्रकरणे पुणे शहर आणि जिल्ह्यातून दाखल प्रकरणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहकांना तडजोडीच्या माध्यमातून विविध सवलती मिळणार आहेत. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण आणि जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांनी केले आहे.या योजनांमध्ये प्रामुख्याने वीज कायदा कलम १३५ आणि १३८ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा समावेश आहे. वीज चोरी प्रकरणात कोर्टात दोषरोपपत्र दाखल नसेल, तर लोकअदालतीमध्ये ग्राहक दाखलपूर्व प्रकरणात तडजोड करू शकतात. वीज चोरी प्रकरणात लोकअदालतीमध्ये तडजोड केल्यास ग्राहकाला वीज बिलात १० ते १५ टक्के सवलत मिळू शकते.जास्तीत जास्त ग्राहकांनी लोकअदालतीद्वारे वीज चोरीत फौजदारी आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणात तडजोड करून मुक्त व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा न्यायाधीश वडगाव मावळ डी. के. अनभुले, सचिव सोनल पाटील आणि महावितरण यांनी केले आहे. महावितरण अभय योजनेबद्दल‘महावितरण अभय योजना- २०२४’अंतर्गत बिलाची संपूर्ण थकबाकी भरल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ केला जातो. तसेच ग्राहकास थकबाकी एकरकमी भरण्याचा किंवा ३० टक्के डाऊन पेमेंटसह जास्तीत जास्त सहा हप्त्यांत भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय उच्चदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास ५ टक्के, तर लघुदाब ग्राहकास १० टक्के अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. यानंतर ग्राहकास आहे त्याचा जागेवर किंवा अन्यत्र पुन्हा वीजजोडणी दिली जाईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रmahavitaranमहावितरणelectricityवीजpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड