वाघोली येथील महावितरणची भूमिगत केबल धोकादायक
By Admin | Updated: May 9, 2017 03:32 IST2017-05-09T03:32:23+5:302017-05-09T03:32:23+5:30
महावितरणच्या वाघोली २२ केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे काम वीज मंडळाचे काम सर्व शासकीय नियमांना डावलून असल्याचा

वाघोली येथील महावितरणची भूमिगत केबल धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाळवाडी : महावितरणच्या वाघोली २२ केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे काम वीज मंडळाचे काम सर्व शासकीय नियमांना डावलून असल्याचा आरोप आणि शेतकरी लोणीकंद पोलीस ठाण्याला कामाची परवानगी पाहण्यासाठी गेले असता, संबंधित शेतकऱ्यांना लोणीकंद पोलीस दमदाटी करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी जनशक्ती विचार मंचाचे प्रदीप कंद यांनी केला आहे.
वाघोली २२ केव्ही भूमिगत केबल (वीजपुरवठा करणारी केबल) टाकण्याचे काम महावितरण कर्मचारी करत असलेल्या जमिनीत पाच फूट खोल गाडून घ्यावी, केबल उघड्यावर राहिल्याने धोका होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीकाळात वीजपुरवठा खंडित राहिल्याने वीजग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, असे मत प्रदीप कंद, अनिल मगर, रूपेश गावडे, सागर झुरंगे, विजय वाळुंज बाजीराव पाचरणे, सोमनाथ आव्हाळे आदी ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.
ठेकेदाराचे कामगार पुणे-नगर रोड बाजूपट्टी न सोडता बाजूपट्ट्यातून खोल न खणता उघड्यावरच केबल असल्याने अपघात घडण्याची शक्यता असल्याने संबंधित ठेकेदार, अधिकारी यांची चौकशी व्हावी व ठेकेदाराची मान्यता रद्द व्हावी, अशी मागणी ऊर्जामंत्री महाराष्ट्र, जिल्हाधिकारी पुणे, आमदार शिरूर, हवेली, मुख्य अभियंता इन्फ्रा मुंबई/पुणे, मुख्य अभियंता रास्ता पेठ वीज मंडळ, कार्यकारी अभियंता प्रकल्प विभाग पुणे, लोणीकंद पोलीस ठाणे व ग्रामपंचायत लोणीकंद आदीकडे केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधला असता होऊ शकला नाही. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम विभागाचा परवाना लोणीकंद पोलिसांकडे परवानगी प्रत दिलेली आहे, तर लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील म्हणाले, की वीज वितरण कंपनीने कसलीही परवानगी मागणीपत्र पोलीस ठाण्याला दिलेले नाही. परिसरातील शेतकरी परवानगी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस ठेकेदाराची बाजू घेत असल्याचा प्रदीप कंद यांचा संतापजनक आरोप.