शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

दर कमी करण्याचा महावितरणचा वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव

By नितीन चौधरी | Updated: January 24, 2025 20:56 IST

महावितरणला पुढील पाच वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा

पुणे : महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा देत ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला आहे. तर २०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी जवळपास समान दर ठेवण्याचा प्रस्ताव असल्याने एकंदरीतच महागाईतही महावितरणने सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषिपंप व घरगुती वापरासाठीही सौरऊर्जेचा वाढता वापर यातून सुमारे २ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत असल्याने महावितरणचा खर्च कमी झाला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर हा निर्णय १ एप्रिलनंतर लागू करण्यात येणार आहे.

महावितरणला पुढील पाच वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा लागतो. त्यानुसार महावितरणने २०२९-३० पर्यंतच्या पाच वर्षांसाठीच्या दर पुनर्रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. यात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे.सध्या लघुदाब ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत वीज वापर असल्यास ८९० रुपये वीजबिल येते. नव्या प्रस्तावात या ग्राहकांना दिलासा देत त्यांचे मासिक वीजबिल ५० ते ६० रुपयांनी कमी होणार आहे. हे बिल आता ८३० रुपयांपर्यंत खाली येणार आहे. तर १०१ ते २०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा देत केवळ १.५ ते २ टक्के दरवाढ अर्थात केवळ २० रुपयांची किरकोळ दरवाढ सुचविण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा वीजवापर असणाऱ्या बहुतांश ग्राहकांना वीजबिलात कोणताही फरक नसेल. त्यामुळे महावितरणने अनेक वर्षांत वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदाच सादर केला आहे.

कृषिपंपांसाठीही सौर वीज वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर वीज वाचत आहे. महावितरणमधील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेतून मिळत असल्याने खर्चावरील मोठा ताण कमी झाला आहे. ही वीज केवळ ३ रुपये प्रतियुनिट या दराने मिळत आहे. सौरऊर्जेचा वापर वाढणार असल्याने भविष्यात महावितरणचा खर्चही कमी होणार आहे. परिणामी आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात दरवाढीऐवजी दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महावितरणने अनेक वर्षांत वीज दरवाढ नव्हे, तर वीजबिल कमी करण्यासाठीचा प्रस्ताव देत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. याचे स्वागतच आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडelectricityवीज