महावितरण आपल्या गावात
By Admin | Updated: December 4, 2015 02:41 IST2015-12-04T02:41:28+5:302015-12-04T02:41:28+5:30
महिन्यातील एका गुरुवारी एका गावात जाऊन तेथील विजेबाबतच्या सर्व समस्या सोडविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्युत महावितरणने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोणी कंद, थेऊर

महावितरण आपल्या गावात
पुणे : महिन्यातील एका गुरुवारी
एका गावात जाऊन तेथील विजेबाबतच्या सर्व समस्या सोडविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्युत महावितरणने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोणी कंद, थेऊर, कापूरहोळ व खानापूर या गावांत आज हा उपक्रम राबविला असून, त्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
भोर, वेल्हा, पुरंदर व हवेलीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर या तालुक्यात सुरू झाला आहे. पवार यांनी आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याची माहिती दिली.
महावितरणने विजेच्या समस्या सोडविण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यात प्रत्येक गुरुवारी एक गाव घेऊन त्या विभागातील सर्व मनुष्यबळ त्या गावात घेऊन जाऊन तेथे एकाच दिवसात समस्या सोडविल्या जाणार आहेत.
ही अभिनव कल्पना असून, महाराष्ट्रात प्रथमच येथे राबविण्यात येत आहे. खेड व बारामती विभागांशीही आमची चर्चा झाली असून, तेथेही ती राबविता येईल, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचे पवार यांनी या वेळी सागितले.
आज पहिल्याच गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या लोणीकंद या गावात कंद यांच्या हस्ते या उपक्रमाला प्रारंभ झाला. तसेच थेऊर, कापूरहोळ व खानापूर येथे महावितरणच्या टीमने तेथील सर्व समस्या सोडविल्या. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
सर्वसाधरण सभेतही या उप्रकमाचे सदस्यांनी कौतुक केले. आमच्या तालुक्यातही हा उपक्रम राबवा, अशी विनंती केली.
काही सदस्यांनी महिन्याला एक गाव घेतले, तर जिल्ह्यातील सर्व गावांतील ससम्या सुटायला वेळ लागेल,
अशी शंका उपस्थित केली.
यावर पवार यांनी पाच-पाच गावांत घेऊ, असे सांगितले. जिल्हा
परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सदस्यांनी सुरुवातील आपल्या गावांत हा उपक्रम राबवावा, असे सांगितले. (प्रतिनिधी)
या उपक्रमामुळे अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. सामान्य जनतेला यामुळे दिलासा मिळेल. जसे निर्मल ग्राम ही शासनाची योजना आहे, तसे महावितरण आपल्या दारात जाऊन तेथील प्रश्न सोडविणार आहे. आमच्या गावातील अनेक प्रश्न आज निकाली निघाले.
- प्रदीप कंद,
अध्यक्ष, जिल्हा परिषद