शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

कॅन्टोन्मेंटची महावितरणकडे पावणेदोन लाखांची थकबाकी, दोन आठवड्यांत जमा न केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:37 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने येथे महावितरणच्या शाखा कार्यालयासाठी दिलेल्या दोन गाळ्यांचे भाडे गेल्या चार वर्षांपासून थकविले असून, नोव्हेंबर २०१७ अखेर थकबाकीची रक्कम एक लाख ८३ हजार ८१७ रुपयांवर पोहोचली असल्याची आकडेवारी समोर आली.

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने येथे महावितरणच्या शाखा कार्यालयासाठी दिलेल्या दोन गाळ्यांचे भाडे गेल्या चार वर्षांपासून थकविले असून, नोव्हेंबर २०१७ अखेर थकबाकीची रक्कम एक लाख ८३ हजार ८१७ रुपयांवर पोहोचली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. येत्या पंधरा दिवसांत थकबाकी जमा न केल्यास बोर्ड प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कॅन्टोन्मेंटने देहूरोड पोलीस ठाण्याजवळ (सेंट्रल रेस्टॉरंटशेजारी) असलेल्या बोर्डाच्या मालकीच्या एलआयजी मार्केटमधील क्रमांक पाच व दहा असे दोन गाळे १९७० सालापासून जुन्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास (सध्या महावितरण) भाड्याने दिले आहेत. या गाळ्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ४११ रुपये भाडे आकारण्यात येत होते. ३१ मार्च २०१२ पर्यंत भाड्यापोटी २० हजार ६५० रुपये थकबाकी होती. एप्रिल २०१२ ते डिसेंबर २०१२ अखेर दरमहा बोर्डाकडून ४११ रुपये भाडे आकारण्यात येत होते.मात्र, बोर्डाने केलेल्या एका ठरावानुसार भाडेवाढ केल्यानंतर दरमहा २ हजार ८७७ रुपये भाडे आकारण्यास सुरुवात केली असून, आजतागायत या दराप्रमाणे भाडे आकारले जात आहे. दरम्यान, महावितरण कंपनीने ११ आॅक्टोबर २०१३ रोजी कॅन्टोन्मेंटकडे एकूण १० हजार २७५ रुपये जमा केल्याचे दिसत आहे. त्यानंतर भाड्याची उर्वरित रक्कम न भरल्याने नोव्हेंबर २०१७ अखेर थकबाकी एक लाख ८३ हजार ८१७ रुपये झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. बोर्डाच्या महसूल विभागाने महावितरणच्या अधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीत सर्व थकबाकीचा पाढाच वाचून दाखवत महावितरण कंपनी वीजबिल न भरल्यास दुसºया दिवशी दंडासह रक्कम वसूल करते याची आठवण करून दिली.>कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी थकबाकीबाबत नाराजी व्यक्त करून येत्या १५ दिवसांत थकीत रक्कम न भरल्यास कारवाई अटळ असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाºयांना स्पष्ट केले. भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे यांनी संबंधित थकबाकीबाबत बोर्डाने भाडेकरार केला आहे का? याबाबत माहिती जाणून घेतली. थकबाकीबाबत सविस्तर माहिती दिल्यास याबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवून याचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती बैठकीत दिली.

टॅग्स :Puneपुणे