शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh: महाविकास आघाडी म्हणजे जनतेची वारंवार फसवणूक करणारे मिस्टर नटवरलालचे सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 12:17 IST

राज्यात अनेक ठिकाणी महिला व मुलींवर अन्याय व अत्याचार झाले. या घटनांमध्ये पोलीस व राजकारण्यांचे हात बरबटले आहेत

पुणे : राज्यातील महिला, तरुणींवर अत्याचार होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून, केवळ आपल्या मंत्र्यांना वाचविण्यास धन्यता मानणारे राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आहे. जनतेची वारंवार फसवणूक करण्याचे काम या सरकारने गेल्या दोन वर्षात केले असून, हे सरकार म्हणजे मिस्टर नटवरलालचे सरकार असल्याची टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली. 

महाविकास आघाडीची फसवणुकीची २ वर्ष अंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत वाघ म्हणाल्या, राज्यात अनेक ठिकाणी महिला व मुलींवर अन्याय व अत्याचार झाले. या घटनांमध्ये पोलीस व राजकारण्यांचे हात बरबटले आहेत. कधीही कुठल्या विषयावर एक न येणारे आघाडी सरकारमधील तीन पक्ष संजय राठोड प्रकरणी एकत्र आले. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही, पारनेरच्या आमदाराने महिला तहसीलदारांना धमकावले तरीही अद्याप गुन्हा दाखल नाही. सरकार व पोलीस मुर्दाड असले तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून, आम्ही याबाबत न्यायालयात दाद मागू असेही त्या म्हणाल्या. 

महिलांवर अन्याय करणारा भाजपचा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार 

पुण्यातील भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी वाघ यांना विचारले असता, महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रत्येकावरच, मग तो भाजपचा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. वाढत्या महिला अत्याचारांना रोखण्यासाठी एस़ व एसटी़ धर्तीवर वूमन ॲट्रॉसिटीसाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

एका नियुक्तीने महिला आयोग पूर्ण नाही

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सशक्त व्यक्ती नियुक्त करणे जरूरी होते. अध्यक्ष नियुक्त झाली असली तरी, आयोगाची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आणखी सहा सदस्य नियुक्त करणे जरूरी असल्याचे वाघ यांनी सांगितले. राज्यात फास्ट ट्रॅकचे १ लाख ६३ हजार ११२ खटले प्रलंबित आहेत.  यापैकी किती खटल्यांचा निकाल लागला याचे उत्तर शासनाने दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी