शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरू; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 11:38 IST

अजित पवारांकडून धरसोड वृत्तीची अपेक्षा नाही..

पुणे: महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु आहे. त्यांचे आप आपसात समन्वय नाही. एक जण म्हणते हे करा एक जण म्हणते ते करा ..असे कसे ना.? हे सरकार लबाड सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

पुण्यामध्ये शुक्रवारी(दि.१२) चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांची वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. 

एमपीएससीच्या मुद्द्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले; एकाच सरकारमधले वडेट्टीवार वेगळं म्हणतात? त्यांच्या सुरात सुर मिसळून पृथ्वीराज चव्हाण बोलतात. त्यांच्या सुरात सूर मिसळून नाना पटोले बोलतात.. सगळ्या विषयांमध्ये सरकारमधला प्रत्येक घटक हा वेगळी भूमिका मांडतो. वीजबिल विषयामध्ये तेच झाले आहे. आता काल त्यांनी तारीख दिली की आठ दिवसांत नवी तारीख देतो का विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा का? “

अजित पवारांकडून अशा धरसोड वृत्तीची अपेक्षा आपल्याला नव्हती असे म्हणत पाटील म्हणाले “ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित दादांनी वीज बिलासंदर्भात भूमिका घेतली. कनेक्शन कट करणार नाही सांगितले. आणि शेवटच्या दिवशी ते बदलले. अजित दादांकडून तरी माझी ही अपेक्षा नव्हती” 

यावेळी गुरुवारी झालेल्या आंदोलन सहभागाबद्दल बोलताना पाटील म्हणाले “ जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे भाजप उभे राहणारच आहे.  भाजपचा कार्यकर्ता कधी लपून राहत नाही” 

दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाउन करु नये अशी भूमिका त्यांनी घेतली. अधिकचे निर्बंध घालावेत पण आर्थिक चक्र बिघडवू नये असे पाटील म्हणाले. मॉलसारख्या ठिकाणी जर गर्दी होत असेल तर टोकन देत मर्यादित लोकांना एकावेळी सोडले पाहिजे. पण नवी बंधने नकोत अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याMPSC examएमपीएससी परीक्षाAjit Pawarअजित पवार