पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ५ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी महात्मा फुले पुण्यतिथीदिनी आझम कॅम्पस ते फुले वाडा अशी अभिवादन मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले. संस्थेच्या कला महाविद्यालयाने सादर केलेला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले अनाथ विद्यार्थ्यांना जेवण वाढतानाचा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण होता. मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे घोषवाक्यांचे फलक हाती धरले होते. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष होते.दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोलताशा, तुतारी-नगारे सहभागी झाले होते. आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पुढे पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक मार्गे विद्यार्थ्यांच्या प्रेरक घोषणांसह ही मिरवणूक महात्मा फुले वाडा येथे पोहोचली. एमसीई सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. मिरवणुकीत डॉ. शैला बुटवाला, डॉ. रशीद शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, डॉ. भूषण पाटील, शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, शाहिद शेख, प्रा. इरफान शेख, प्रा. रबाब खान, मुमताज सय्यद, डॉ. आर. गणेसन, अजीम गुडाखूवाला, प्राध्यापक, संस्थेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
अभिवादन मिरवणुकीतून महात्मा फुले यांना पुण्यात आदरांजली; ५ हजार विद्यार्थी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 14:04 IST
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ५ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी महात्मा फुले पुण्यतिथीदिनी आझम कॅम्पस ते फुले वाडा अशी अभिवादन मिरवणूक काढली.
अभिवादन मिरवणुकीतून महात्मा फुले यांना पुण्यात आदरांजली; ५ हजार विद्यार्थी सहभागी
ठळक मुद्देमहात्मा फुले-सावित्रीबाई फुले अनाथ विद्यार्थ्यांना जेवण वाढतानाचा देखावा मिरवणुकीचे आकर्षणअभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७वे वर्ष, विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांचे फलक धरले हाती