शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा एकत्रित विकास करणार

By राजू हिंगे | Updated: June 21, 2024 20:28 IST

दोन्ही स्मारक एकत्रित विकास करण्यासाठी १० हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्र संपादीत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला

पुणे:  शहराच्या मध्यवस्तीमधील गंज पेठेत महात्मा ज्योतिराव फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे दिडशे मीटर अंतरावरच वेगवेगळी स्मारक आहेत. ही दोन्ही स्मारक एकत्रित  विकास करण्यासाठी  १० हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्र संपादीत करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या जागेवर आजमितीला जुनी घरे आणि वाडे असून तिथे ५१६ घर मालक तर २८६ भाडेकरू अशी सुमारे ८०२ कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील रहिवाश्यांचे सामंजस्यांने भूसंपादन केले जाणार आहे.

गंज पेठेत महात्मा फुले वाडा आहे. या वाड्याशेजारी अवघ्या दिडशे मीटर अंतरावर महापालिकेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारले आहे. हा वाडा आणि स्मारकाला रोज नागरिक भेट देण्यासाठी येतात. मात्र येथे वाहतुक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने व नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या दोन्ही स्मारकांचा विस्तार आणि या वास्तूंसाठी जोडरस्ता तातडीने विकसित करण्याची गरज असल्याची मागणी सातत्याने केली जात होती. या दोन्ही स्मारकांच्या मध्ये निवासी भाग आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी राहाणार्‍या नागरिकांचे पुनर्वसन अथवा त्यांना योग्य मोबदला देउन ही दोन्ही स्मारके जोडून आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आता थेट संपूर्ण परिसर मोकळा करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. 

भुसंपादनाचा खर्च राज्यसरकार करणार 

या स्मारकाच्या विकसनासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये स्मारक परिसराच्याच्या आरक्षण मान्य करण्यात आले आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आवश्यक जागेच्या संपादनाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. भुसपंदनाचा खर्च राज्यसरकार करणार आहे. यासंदर्भाने आज स्थानीक क्षेत्रिय अधिकारी आणि अभियंत्यांची बैठक घेतली. घर मालक आणि भाडेकरूंसोबत संवाद साधून भूसंपादनाचा तोडगा काढण्यात येईल. तत्पुर्वी संबधित घरमालक आणि भाडेकरूंना नोटीसेस पाठविण्यात येतील. सर्व संमतीनेच संपादनाची प्रक्रिया करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेेंद्र भोसले आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एकत्र करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्यासंदर्भात भूसंपादन करण्याच्याही सुचना दिल्या आहेत. येथील रहिवाश्यांचे सामंजस्यांने भूसंपादनाचा अमाचा प्रयत्न असणार आहे.- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त , पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेState Governmentराज्य सरकारMONEYपैसा