शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसाठी पुण्यात ‘महारुद्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 07:44 IST

पुण्यात २५ एकर जागा, १०० कोटी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क    मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील लाखो लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण देण्यासाठी एक कायमस्वरुपी संस्था पुणे येथे उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामविकास आणि संशोधन संस्था (महारुद्र) असे या संस्थेचे नाव असेल. त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली.  

राज्यातील ही अशा प्रकारची पहिलीच संस्था असेल. प्रशिक्षणाबरोबरच ग्रामविकासाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठीचे संशोधनही या ठिकाणी केले जाईल. गोवा, गुजरात, राजस्थान, दिव दमण, दादर नगरहवेलीतील ग्रामविकासासंदर्भातील मुख्य संशोधन केंद्र म्हणूनही ही संस्था कार्यरत असेल.

आतापर्यंत यशदा; पुणे येथे ग्रामविकासाबाबत प्रशिक्षण देणारी ग्रामविकास संस्था होती. मात्र तिचे स्वरुप मर्यादित होते. महारुद्र ही पूर्णत: ग्रामविकासाच्या दृष्टीने समर्पित अशी संस्था असेल. - गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

प्रशिक्षणाचा कोणाला लाभ? राज्यातील जिल्हा परिषदांमधील ३,५०० सदस्य, पंचायत समित्यांमधील ७ हजार सदस्य आणि २८ हजार ग्रामपंचायतींमधील सुमारे २ लाख ८० हजार सदस्यांना या ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाईल. या शिवाय या तिन्ही प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक