महर्षी कर्वे संस्थेच्या केंद्राला पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST2021-05-26T04:11:30+5:302021-05-26T04:11:30+5:30

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन ...

Maharshi Karve announces award to Sanstha Kendra | महर्षी कर्वे संस्थेच्या केंद्राला पुरस्कार जाहीर

महर्षी कर्वे संस्थेच्या केंद्राला पुरस्कार जाहीर

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते देण्यात येईल. तसेच, व्यवस्थापन प्रतिनिधी राजेश पांडे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या १ ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण विद्यापीठात केले जाणार आहे. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये कोरोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मातोश्री रमाई मातृशक्ती पुरस्कार निवड समितीने कर्वे शिक्षण संस्थेच्या कोरोना काळजी केंद्राची पुरस्कारासाठी एकमताने निवड केली असल्याचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी सांगितले.

---------

Web Title: Maharshi Karve announces award to Sanstha Kendra