शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतील महारोजगार मेळावा रद्द; कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळल्याने निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:16 IST

हा रोजगार मेळावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार होता....

पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांचेमार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जेजुरी येथे १३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. पण पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. महारोजगार मेळाव्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार होता. तसेच 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. पण या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

तीर्थक्षेत्र जेजुरीत गुरुवारी' शासन आपल्या दारी' आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा मंडप टाकण्याचे काम सुरू होते. साधारणपणे १ लाख ५७ हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे २१ हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत होता. गेले आठवडाभर याचे काम युद्ध पातळीवरून सुरू होते. मुख्य व्यासपीठ आणि त्यासमोर व्हीआयपी कक्ष त्याच्या मागच्या बाजूला लाभार्थ्यासाठी मंडप उभारला जात होता. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास या कक्षाच्या मंडपसाठी लोखंडी पिलर उभारून सांगाडा तयार करण्यात आला होता. सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असता हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. सांगाड्याखाली कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कार्यक्रमापूर्वीच सांगाडा कोसल्याने भविष्यातील मोठा अनुचित प्रकार टळल्याची चर्चा आहे. रात्रंदिवस मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने कामगारांना अजिबात विश्रांतीही मिळत नाही. रात्री ३ वाजता सांगाडा कोसळल्यानंतर ठेकेदाराने रातोरात सांगाडा उभा करण्यासाठी  कामगारांना कामाला लावले होते. सकाळपर्यंत कोसळलेला संपूर्ण सांगाडा खोलून पुन्हा उभारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही काम करून झोपायला गेलो असता दहा मिनिटातच सांगाडा कोसळल्याचे तेथील कामगारांनी सांगितले.

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणे