शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा

By नितीन चौधरी | Updated: June 6, 2025 16:04 IST

घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाब देयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत.

पुणे : बांधकाम प्रकल्पांमधून फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांना प्रकल्पाची प्राथमिक माहिती आवश्यक असते. यासाठी महारेराने गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरा प्रमाणपत्र आणि त्या सोबतच्या परिशिष्टातच प्रकल्पाची मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध देण्याचे बंधन केले आहे. पूर्वीच्या प्रमाणपत्रात प्रकल्प, प्रवर्तकाचे नाव, पत्ते दिले जात होते. आता नवीन प्रमाणपत्रात प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते या जुन्या माहितीसह प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ, इमारतीचे व विंगचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले; प्रकल्पातील निवासी, अनिवासी सदनिका, गाळ्यांची संख्या; परवानगी मिळालेल्या मजल्यांची संख्या; चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठीच्या एकूण पार्किंगची संख्या असा सर्व तपशील दिला जाणार आहे. 

नवीन प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ, इमारतीचे व विंग्जचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले, प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या, इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे, याचा तपशील दर्शवणारे प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी); चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठींच्या एकूण पार्किंगची संख्या हा समग्र तपशील या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात पहिल्यांदाच असणार आहे. 

तसेच या प्रकल्पाच्या आयुष्यात प्रवर्तकाने प्रकल्पात काही दुरुस्त्या केल्यास, प्रकल्पाला मुदतवाढ घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतरण केल्यास हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात राहणार आहे. हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करावे लागते. प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असते. याशिवाय प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती क्यूआर कोडमध्ये देऊन सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकासोबत छापणे पूर्वीच महारेराने बंधनकारक केलेले आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करूनही प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवता येऊ शकते.

घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाब देयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. त्यात प्रमाणित घर विक्रीकरार, घर नोंदणीपत्र, पार्किंगची लांबी, रुंदी, उंची, स्थळ तसेच आश्वासित सेवा सुविधांच्या उपलब्धतेचे तपशील अशा बाबी अपरिवर्तनीय असल्याचे महारेराने यापूर्वीच जाहीर केले आहे.

नवीन महारेरा नोंदणी प्रमाणपत्रांची वैशिष्ट्ये

- गृहनिर्माण प्रकल्पाचे व प्रवर्तकाचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक हा तपशील आता वाचायला, समजायला सोपा जावा म्हणून ठळक अक्षरांत

- प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ

- इमारतीचे, विंगचे नाव, क्रमांक

- प्रकल्पाचे निवासयोग्य मंजूर मजले

- निवासी, अनिवासी इमारती किती

- बांधकाम परवानगी किती मजल्यापर्यंत आहे हे दर्शवणारे प्रमाणपत्र

- चारचाकी, दुचाकी, अभ्यागतांसाठी अशी एकूण सर्व पार्किंग किती

- शिवाय संबंधित प्रकल्पात भविष्यात काही दुरुस्त्या, मुदतवाढ, प्रकल्प दुसऱ्या प्रवर्तकाला हस्तांतरित झाला असल्यास तोही तपशील वेळोवेळी जारी होणाऱ्या प्रमाणपत्रात असणार.

या निर्णयांचा घर खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून देशातील इतर अनेक विनियामक प्राधिकरणांनीही त्यांच्या क्षेत्रात या निर्णयांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. नोंदणी प्रमाणपत्रात ही माहिती समाविष्ट करण्याचा हा निर्णयही असाच ग्राहकांना चांगल्या प्रकारे मदत करणारा, पथदर्शक आणि महत्त्वपूर्ण आहे. - मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड