शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : थंडीत घट, राज्यात ढगाळ वातावरण, पावसाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Updated: December 23, 2024 16:03 IST

काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्यामध्ये दोन दिवसांपासून थंडीत घट झाली असून, पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यामधील काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यातही दुपारपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.सध्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली मंगळवारपर्यंत (दि.२४) उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाकाही कमी - अधिक होत आहे. राज्यामध्ये सोमवारी (दि.२३) मंगळवारी आणि बुधवारी काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसेच तापमानात चढ उतार राहणार आहे. गुरुवारी पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहणार असून, हलक्या पावसाची शक्यता आहे.दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर शुक्रवारी (दि.२७) पुणे, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट आहे. तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार दि. २७ डिसेंबरला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण २५ जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम ह्या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. गारपीटीची शक्यता कश्यामुळे वाढली?सध्याच्या २६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेयला दीड ते दोन किमी. उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. तर ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैरुक्त दिशेकडून वारे येत असून, बं. उपसागरातून पूर्वे दिशेकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे अश्या तीन वाऱ्यांच्या टक्करीतून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडweatherहवामानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन