शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
4
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
5
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
6
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
7
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
8
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
9
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
10
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
11
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
12
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
13
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
14
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
15
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
16
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
17
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
18
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
19
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
20
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!

Vidhan Sabha 2019 : ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या भूमिकेला शरद पवारांनी दिली बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:31 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - अहमदनगरमध्ये अजित पवारांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचे सांगत ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ला ‘धर्मनिरपेक्ष’तेची कात्री लावली आहे.

पुणे : काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन पक्ष ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा स्वीकार करीत असल्याचे दर्शविले होते. परंतु, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पुतण्याच्या ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ला काकांनी कात्री देत अहमदनगरमध्ये अजित पवारांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचे सांगत ‘सॉफ्ट हिंदुत्वा’ला ‘धर्मनिरपेक्ष’तेची कात्री लावली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामधून बरेचसे नेते आणि कार्यकर्ते भाजपा-सेनेमध्ये प्रवेश करू लागले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यभरामध्ये भाजपा-सेनेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी तसेच जनसंवादासाठी ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढली. या यात्रेदरम्यान, अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये पक्षाच्या झेंड्यासोबतच भगवा ध्वजही लावण्यात येईल. भगवा ध्वज ही भाजपा-सेनेची मक्तेदारी नाही, अशी भूमिका मांडली होती.सत्ताधारी पक्षांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढवल्या जाणाऱ्या निवडणुका, २०१४ सालच्या विधानसभा आणि लोकसभा तसेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश पाहता बहुसंख्यांकांमधील मते वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जाऊ लागले होते. मराठा समाजही पक्षापासून दुरावल्याची जाणीव झाल्याने या समाजाला आकर्षित करण्यासाठी भगवा झेंडा लावण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा अंगीकार करण्यात आला. परंतु, त्याच वेळी राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष आणि जात-पात विरहीत राजकारण करणारा पक्ष असतानाही एका विशिष्ट रंगाचा झेंडा लावण्याचा निर्णय का घेतला गेला असा प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांना पडला होता. राष्ट्रवादीमध्ये विविध समाजांचे ‘सेल’ असून प्रत्येक समाजाचा वेगळ्या रंगाचा झेंडा आहे. याविषयी पक्षांतर्गत सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा सुरु होत्या.पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, ही अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असून पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे म्हटले आहे. पवार यांनी पक्षाच्या आणि स्वत:च्या धर्मनिरपेक्ष ‘इमेज’ला धक्का लागणार नाही याची काळजी हे वक्तव्य करताना घेतली. पक्षांतर्गतच भूमिकांविषयी एकमत नसेल तर कार्यकर्त्यांनी नेमक्या कोणत्या भूमिका घ्यायच्या याविषयी संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. पक्षाला पडझडीच्या या काळात हे परवडणारे नक्कीच नाही.>शरद पवार यांनी भगवा ध्वज न लावण्याची घेतलेली भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसून पवार साहेबांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेविषयी सर्वांना कल्पना आहे.- अंकुश काकडे, प्रवक्ते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019