महाराष्ट्र साहित्य पत्रिका ‘अॅप’वर
By Admin | Updated: June 6, 2015 22:19 IST2015-06-06T22:19:13+5:302015-06-06T22:19:13+5:30
साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या ‘आॅनलाईन’ अंकानंतर आता टेक्नोसॅव्ही’ तरूणांना मोबाईल अॅप्लिकेशवर हा अंक उपलब्ध होणार आहे

महाराष्ट्र साहित्य पत्रिका ‘अॅप’वर
पुणे : साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या ‘आॅनलाईन’ अंकानंतर आता टेक्नोसॅव्ही’ तरूणांना मोबाईल अॅप्लिकेशवर हा अंक उपलब्ध होणार आहे. नोंदणी केलेल्या सदस्यांनाच नव्हे, तर जगभरातील मराठीभाषाप्रेमींनाही हा अंक अॅपच्या माध्यमातून वाचता येणार आहे. एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. नव्या पिढीची वैचारिक भूक भागविण्याबरोबरच तरूणाई देखील या साहित्य पत्रिकेशी जोडली जावी या हेतूने साहित्य पत्रिका ही सुरूवातीला आॅनलाईन करण्यात आली. सातारा, सांगलीपासून ते बडोदा, गुलबर्गा आदी बृहन्महाराष्ट्रातील वाचकांकडूनही संकेतस्थळावरील पीडीएफ स्वरूपातील अंक डाऊनलोड करून वाचण्याचे प्रमाण वाढत आहे.