शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

Maharashtra HSC Result| पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याची बाजी; यंदा मुलीच अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 20:02 IST

दोन वर्षानंतर यंदा प्रथमच बारावीची परीक्षा ऑफलाइन...

पुणे :पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याने बारावी परीक्षेचा निकालात (९७.२२ टक्के) बाजी मारली आहे. वेल्ह्याचा (९६.६० टक्के) दुसरा तर भोर तालुक्याला तिसरा (९६.५५ टक्के) क्रमांक मिळाला आहे. तर सवार्त कमी पुणे शहर पश्चिम भागाचा (८९.५७ टक्के) निकाल लागला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.६४ टक्के, पुणे शहर पूर्वचा ९२.७३ टक्के तर पुणे शहर पश्चिमचा निकाल ८९.५७ टक्के निकाल लागला आहे. पुणे जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.७० टक्के लागला असून पुन्हा एकदा मुलीच अव्वल आल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर यंदा प्रथमच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली.जिल्ह्याचा टक्केवारीनुसार तालुकानिहाय निकाल-

०१) दौंड तालुक्यातून ४ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९७.२२ टक्के लागला आहे. १५३ विद्याथी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०२) वेल्हा तालुक्यातून ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९६.६० टक्के लागला आहे. १८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०३) भोर तालुक्यातून २ हजार १० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९६.५५ टक्के लागला आहे. ७७ विद्याथी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०४) इंदापूर तालुक्यातून ५ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ५७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९६.१७ टक्के लागला आहे. २८० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०५) आंबेगाव तालुक्यातून २ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ५३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९५.७६ टक्के लागला आहे. १३१ विद्याथी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०६) शिरूर तालुक्यातून ५ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार २३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९४.७३ टक्के लागला आहे. ३३३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०७) मुळशी तालुक्यातून २ हजार ५६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९४.३९ टक्के लागला आहे. १५२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०८) हवेली तालुक्यातून १० हजार २६३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९३.६१ टक्के लागला आहे. ७४२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०९) पुरंदर तालुक्यातून २ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ३८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९२.३३ टक्के लागला आहे. २१८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

१०) जुन्नर तालुक्यातून ५ हजार २८० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९२.३० टक्के लागला आहे. ४३६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

११) खेड तालुक्यातून ४ हजार ८५४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ३७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९१.१३ टक्के लागला आहे. ४८४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

१२) बारामती तालुक्यातून ७ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९१.१३ टक्के लागला आहे. ७२८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

१३) मावळ तालुक्यातून ४ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी निकाल ९०.५६ टक्के हा मावळ तालुक्याचा लागला आहे. ४०१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

महापालिका क्षेत्रात पिंपरी-चिंचवड ठरले अव्वल-

०१) पिंपरी-चिंचवड भागातून १७ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९४.६४ टक्के लागला आहे. १ हजार ४० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०२) पुणे शहर पूर्व भागातून २३ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९२.७३ टक्के लागला आहे. १ हजार ८२९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०३) पुणे शहर पश्चिम २७ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरी भागात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सर्वात कमी निकाल ८९.४१ टक्के हा पुणे शहर पश्चिम भागाचा लागला आहे. ३ हजार ५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड