शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 07:00 IST

नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारांनी कामावर जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडले...

ठळक मुद्देमतदान केद्रांवरील वर्ग खोल्यांबाहेर मतदारांच्या लागल्या होत्या रांगा

पुणे :  पावसाने उघडीप दिली असली तरी शनिवार-रविवार जोडून आलेल्या सुट्टीचा काहीसा परिणाम कसबा पेठ मतदारसंघातील मतदानावर झाल्याचे पाहायला मिळाले. पारंपरिक मतदारांनी दुपारी तीन नंतर मतदानासाठी मुहूर्त साधला. यावेळेत मतदान केद्रांवरील वर्ग खोल्यांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये विशेषत: महिलांचे प्रमाण अधिक होते. कसबामध्ये यंदा संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३६.०८ टक्के मतदान झाले होते.   कसबा विधानसभा मतदार संघामध्ये सकाळी सात वाजल्यानंतर काही मतदान केंद्रांवर अगदी तुरळक प्रमाणात मतदान झाले. पर्वती, सारसबाग, महाराणा प्रताप उद्यान, वा. द. वर्तक उद्यान येथे पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांपैकी काही जणांनी तसेच वेगवेगेळ्या हास्यक्लबमधील ज्येष्ठ नागरिकांनी थेट मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला. नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारांनी कामावर जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. महापौर मुक्ता टिळक यांनी कुटुंबीयांसमवेच केळकर रस्त्यावरील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. खासदार गिरीश बापट यांनी कुटुंबीयांसमवेत अहिल्यादेवी प्रशालेमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पत्नी गिरिजा, पुत्र गौरव आणि स्नुषा स्वरदा या वेळी उपस्थित होत्या. अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाकडून मतदार स्लिप मिळाल्या नसल्याच्या तक्रारी केल्या.  नाना वाडा, केळकर रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय प्राथमिक शाळा, कन्या शाळा, गोगटे प्रशाला, बाजीराव रस्त्यावरील सरस्वती विद्या मंदिर, नूमवि प्रशाला, आदर्श विद्यालय, रेणुका स्वरूप प्रशाला, दारुवाला पुलाजवळील आरसीएम प्रशाला या पेठांमधील मतदान केंद्रामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदारांची रांग लागली होती. कसब्यातील बहुतांश मतदान केद्रांतील वर्गखोल्या तळमजल्यावरच होत्या. त्यामुळे अपंग, अपघातग्रस्त मतदारांना फारसा त्रास झाला नाही. शिवाजी मराठा हायस्कूल,नूमवि प्रशालेमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना मतदान सुलभपणे करता यावे यासाठी रिक्षाने आतपर्यंत सोडण्यात आले. अनेक ठिकाणी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कडक ऊन पडल्यामुळे दुपारी बारानंतर मतदान केंद्रे ओस पडू लागली. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काही काळासाठी विसावा मिळाला. तुरळक असणाऱ्या मतदारांची संख्या सायंकाळी साडेचारनंतर वाढू लागली आणि अनेक मतदान केंद्रातील वर्गखोल्यांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यवर्ती भागातील पेठांपेक्षाही गणेश पेठ, रास्ता पेठ सारख्या भागांमधील केंद्रावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडूनही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सहकार्य करण्यात येत येत होते. शेवटच्या टप्प्यातही काही भागांमध्ये मतदान सुरूच असल्याचे पाहायला मिळाले..................................

टॅग्स :Puneपुणेkasba-peth-acकसबा पेठPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019