शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Maharashtra Election 2019 : शिरुर - हवेली मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादीत होणार काँटे की टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:40 IST

पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघावर कोणत्याच पक्षाला जास्त काळ पकड ठेवत आली नाही़..

दुर्गेश मोरे-

पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघावर कोणत्याच पक्षाला जास्त काळ पकड ठेवत आली नाही़ विधानसभा निवडणुकीत प्रत्येक वेळेस मतदारांनी बदल घडविला आहे़. यंदा दुरंगी लढत दिसून येत आहे़ वास्तविक पाहता सहकार क्षेत्र, मूलभूत सुविधा, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर परिसरात बेरोजगारीचे वाढते प्रमाण यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीचे विषय आहेत. राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनीही कारखाना कार्यक्षेत्राच्या माध्यमातून या भागात पकड मजूबत केली आहे़. एकूणच दोन्ही उमेदवार एकमेकांच्या तोडीस तोड असून, काँटे की टक्कर होणार, हे नक्की़.  पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाºया शिरूर-हवेलीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे, तर राष्ट्रवादीकडून अशोक पवार मैदानात उतरले आहेत़ या मतदारसंघात काही प्रश्नांवरच संपूर्ण निवडणूक अवलंबून आहे़. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन, पाच वर्षांपूर्वी दिलेले वचन आजपर्यंत ते पूर्ण झाले नाही; तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचेही पुणे बाजार समितीत विलीनीकरण झाले़. त्या वेळी विद्यमान आमदारांनी भूमिका बजावणे आवश्यक होते; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरदौरा यामुळे भाजपचे निष्ठावंत त्यांच्याच पाठीशी असल्याचे चित्र स्पष्ट झाले़. त्याचबरोबर घोडगंगा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र याच मतदारसंघात असल्यामुळे साहजिक मतदारांपर्यंत त्यांना पोहोचणे काही कठीण काम नाही़. अजित पवार यांचे एक अत्यंत निष्ठावान आणि जवळचे मानले जाणारे अशोक पवार यांनी त्यांच्या २००९ च्या कार्यकाळामध्ये प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालये यांसह अन्य विकासकामे केली़. ...........प्रदीप कंद यांचा परिणाम होणार का?राष्ट्रवादीचे प्रदीप कंद यांनी आमदारकीसाठीही प्रयत्न केले़ त्यात अपयश मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली; पण त्याचे मतांत रूपांतर होईल हे सांगणे कठीणच आहे़ स्वत: उभे राहणे आणि दुसऱ्यासाठी मते मागणे यात फरक असतो़. राष्ट्रवादीचेही या भागात वर्चस्व आहे़, ही गोष्टही दुर्लक्षित करून चालणार नाही.

टॅग्स :Shirurशिरुरshirur-acशिरूरElectionनिवडणूकPoliticsराजकारणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019