शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कॅन्टोन्मेंटमधील मतदानाची सुरुवात अन शेवट कासवगतीनेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 07:00 IST

Pune Cantonment board Election 2019 : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण 30 जागांवरील 274 केंद्रांमध्ये मतदान पार पडले.

ठळक मुद्देसायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ 38.14 टक्के मतदान : अपवाद वगळता बहुतांशी मतदान केंद्रावर तुरळक गर्दीमतदारांचा मतदानाचा उत्साह वाढ

पुणे : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने मतदारांना आवाहन करण्यात आले असले तरी दुसरीकडे प्रत्यक्षात बहुतांशी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ 38.14 टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या वर्षी मोठ्या संख्येने मतदान होईल असा अंदाज बांधणाऱ्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेल्या मतदानास सुरुवातीपासूनच अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहवयास मिळाले.  वेधशाळेने मतदानावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज यापूर्वी नोंदविला होता. मात्र पावसाने अंदाज खोटा ठरवला. सकाळी ढगाळ हवामान असल्याने पाऊस पडणार असल्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत पाऊसाने दडी मारली. परंतु मतदानाला येणाऱ्यांची संख्या जेमतेम होती. सेंट मीराज इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कूल, सरस्वती विद्या युनियन हायर सेकंडरी स्कूल, तसेच महात्मा ज्योतिबा फुले मुलीचे हायस्कूल या केंद्रावर सकाळी मतदानास चांगला प्रतिसाद मिळाला. तर पुणे इस्लामिया उर्दु प्राथमिक शाळा, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयात तुलनेने कमी गर्दी दिसून आली. दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला होता. साधारण दोन नंतर मतदानाची टक्केवारीत वाढ झाली होती. तीन पर्यंत 27.11 टक्के मतदान या मतदारसंघात झाले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असणा-या पावसाने अनेक केंद्रांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले होते. विशेषत: महात्मा फुले मुलांची शाळा या भागात राडारोडा झाल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याकरिता कसरत करावी लागत होती. यावेळी प्रशासनाकडून येण्या जाण्याकरिता लाकडी फळ्या टाकण्यात आल्या होत्या.   दुपारी 4 नंतर मात्र मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. शेवटच्या टप्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर ठेवण्यात आला होता. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण 30 जागांवरील 274 केंद्रांमध्ये मतदान पार पड्ले. याकरिता एकूण 1 हजार 482 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आले होते. तसेच 27 केंद्रावर वेबकास्टींगची सोय करण्यात आली होती. याशिवाय दिव्यांग मतदारांच्या मतदानाकरिता विशेष व्यवस्था कार्यरत होती. 

मतदारांचा मतदानाचा उत्साह वाढ

सोमवारी सकाळी वाजेपर्यंत 3.15 टक्के एवढे मतदान झाले होते. दुपारी 1 वाजता मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 18.90 टक्के एवढी होती.  

टॅग्स :Puneपुणेpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान