शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

Maharashtra Election 2019 : नव्याण्णव वर्षांचा ‘तरुण’ मतदानासाठी उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 16:48 IST

देशाची पहिली निवडणुक पाहिलेले पुण्यातील नव्याण्णव वर्षाचे साेपानराव कालेकर यंदाच्या निवडणुकीत देखील ते उत्साहाने मतदान करणार आहेत.

- अतुल चिंचली

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यनंतर पहिली लोकसभा निवडणूक १९५२ साली झाली. तेव्हापासून आतापर्यंत मला लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका, तिन्ही निवडणुकीत मतदान करत आले आहे, अशा भावना ९९ वर्षांच्या सोपानराव कालेकरांनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. सोपान कालेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील अंदोरी गावात १९ ऑगस्ट १९२१ साली झाला. आता ते बुधवार पेठेतील, विजय मारुती चौकातील मोघल मार्केटसमोर वास्तव्यास आहेत. सोपानराव बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ वृत्तपत्रे विकणे, गाडीवरून मीठ विकणे, खडी पाडायला असे लहान लहान व्यवसाय करत असे. आता ते कापड व्यापारी आहेत.

कालेकर म्हणाले, पहिल्या लोकसभेला आपल्या भागातून काकासाहेब गाडगीळ हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. तो काळ काँग्रेसचा असला तरी कम्युनिस्ट, सोशलिस्ट समाजवादी, जनसंघ आणि हिंदू महासभा असे पक्ष होते. तर केशवराव जेधे, शंकरराव मोरे, नानासाहेब गोरे, श्रीपाद डांगे सारखी राजकीय मंडळी होती.

पूर्वीपासून आपल्याकडे उमेदवार बघूनच मतदान केले जात होते. ती परंपरा अजूनही टिकून राहिली आहे. १९५२ नंतर संपूर्ण भारतात इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा नेत्यांचा काळ सुरू झाला. पण त्याच काळात जनसंघ, हिंदू महासभा यासारखे पक्ष वर येऊ लागले होते.निवडणुकीच्या काळात लक्ष्मी रस्त्याने नेहरूंची रॅली चालली होती. ते पाहण्यासाठी लोकांमध्ये निवडणुकीचा उत्साह दिसून येत होता. पूर्वी वाहनांचे प्रमाण कमी होते. अशा वेळी सर्वच राजकीय नेते मोठमोठ्या रॅली काढत असे. सुरुवातीचा काळ  काँग्रेसचा काळ होता. त्यामुळे उमेदवार बघितला जात नव्हता. आता मात्र सामान्य नागरिक हुशार झाले आहेत. सद्यस्थितीत उमेदवाराचे शिक्षणही बघितले जाते. राजकारणात कितीही बदल झाला तरी उमेदवार निवडून देणे आपल्या हातात असते.

दीर्घायुष्याचे रहस्य उलघडताना कालेकर म्हणाले की, आजकालच्या सुरळीत रस्त्यावरून सायकलवर प्रवास करणे अवघड झाले आहे. पण तेव्हा असणाऱ्या चिंचोळ्या आणि खडबडीत रस्त्यावरून आम्ही सायकल चालवत होतो. तर मोठी अगरबत्ती लावून ती संपेपर्यंत जोर, बैठक मारत असे.शरीर निरोगी राहण्याचे हेच एकमेव कारण आहे.

देशच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान कराआधुनिक जगात भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते. पण सध्याचे तरुण प्रचारफेरी, उमेदवारांची रॅलमध्ये फिरताना दिसतात. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मतदान करावे, असे त्यांनी आवाहन केले.- सोपानराव कालेकर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PuneपुणेVotingमतदान