शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 16:08 IST

Maharashtra Election 2019 : सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजय निश्चित..

ठळक मुद्देराज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेलजमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दिली दाद

चाकण : काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून काम करता आले नाही. म्हणून शिवसेना सत्ता चालवत होती. आणि संघर्षही करत होती. बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न राज्यापुढे उभे आहेत. हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. राज्याच्या विकासाआड येणाऱ्या या दहातोंडी रावणाचा जनताच वध करेल. तसेच राज्यात पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, सभेला असलेली गर्दी लक्षात घेता सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजयी निश्चित झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़. चाकण येथील खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे,यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश गोरे,  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड,  सुलभा उबाळे, रामदास धनवटे, जयप्रकाश परदेशी, प्रकाश वाडेकरआदी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, महायुतीच्या उमेदवारांना मिळणारे मत म्हणजेच जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवघ्या दहा रुपयांत जेवण देता येईल यासाठी हजार भोजनालये सुरु करण्याची आमची योजना आहे़ यामुळे  महिलांना रोजगार मिळेल़ उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण, शेतकºयांना शंभर टक्के कर्जमुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा देण्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ सुरेश गोरे म्हणाले, खेड तालुक्यात मागील पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा करताना गुन्हेगारी निपटून काढली. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. गुन्हेगार प्रचारात सक्रिय झाले आहेत. मतदारांमध्ये गावोगावी  भीतीचे  वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्ती गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले़ .......चाकणमधील सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अपक्षांना नाकारा असे आवाहन केले. नवमहाराष्ट्र घडविण्यात साथ देणार का? असा प्रश्न विचारला, यावेळी जमलेल्या नागरिकांनी जोरदार टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली. त्याचप्रमाणे खेड तालुक्यात निवडणूक काळात सुरु झालेली गुन्हेगारी या बाबत आणि खंबीरपणे जनतेच्या सोबत राहणार असल्याबाबत सेनेचे उमेदवार आ. सुरेश गोरे यांनी भाष्य करताच उपस्थित जनसमुदायाने घोषणाबाजी करीत वक्तव्यास दाद दिली.   

टॅग्स :Chakanचाकणkhed-alandi-acखेड आळंदीAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक