शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 20:23 IST

Pune Election 2019 : मोबाईलवर बोलणे, घोळका करणे, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंदी अशी विविध बंधने या परिसरात असतात.

ठळक मुद्देराजकीय पक्षांचे बुथही किमान २०० मीटर अंतरावर

पुणे : मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरात मतदान कर्मचारी व मतदार वगळता इतर कोणालाही प्रवेशास बंदी आहे. मोबाईलवर बोलणे, घोळका करणे, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंदी अशी विविध बंधने या परिसरात असतात. पण पर्वती मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर ही बंधने धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही मतदान केंद्रांच्या इमारतीमध्येच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणुक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसून आले. तर मतदान कक्षामध्येही सर्रासपणे मोबाईलचा वापर होत होता.केंद्रीय निवडणुक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्राच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर लक्ष्मणरेषा आखली जाते. मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने हा नियम करण्यात आला आहे. तसेच राजकीय पक्षांचे बुथही किमान २०० मीटर अंतरावर असावेत, असा नियम आहे. मात्र, सोमवारी पर्वती मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर या नियमांना केराची टोपली दाखविण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा हायस्कुलमध्ये मतदान केंद्र होते. या इमारतीच्या आवारातच काही कार्यकर्ते मतदारांना ‘लक्षात आहे ना’ असे सांगत मतदान कोणाला करायचे याची आठवण करून देत होते. पर्वतीमधील लक्ष्मीबाई साळुंके विद्यालयाच्या आवारातही हेच चित्र पाहायला मिळाले. मतदार केंद्रामध्ये आल्यानंतर काही कार्यकर्ते त्यांच्याजवळ जाऊन विचारपुस करताना दिसत होते. राजकीय पक्षांचे बुथवर मतदारांना त्यांच्या नावाच्या स्लिप दिल्या जात होत्या. पण बहुतेक मतदार केंद्र परिसरातील बुथ २०० मीटर अंतराच्या आतच होते. काही बुथ तर १०० मीटरच्या आतही पाहायला मिळाले. तिथूनच मतदारांना स्पीप वाटप केले होते. काही बुथवर राजकीय पक्षाचे चिन्ह असलेल्या स्लीपचे वाटप होत होते. त्यामुळे मतदारही त्याच स्लीप मतदान केंद्रात घेऊन जात होते. काही केंद्रांवर त्यांना अडवून चिन्हाचा भाग फाडण्यात आला. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असली तरी त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात आले. मार्केटयार्ड येथील कटारिया हायस्कुलमधील एका केंद्रांवर मोबाईलला बंदी असा फलक पाहायला मिळाला. पण या केंद्रासह लगतच्या इतर केंद्रांवर बहुतेक प्रत्येकाकडे मोबाईल होता. काही जण तर मतदान केंद्रांमध्येच मोबाईलवर बोलताना आढळून आले. पोलिसांकडून अशा मतदारांना हटकले जात होते. --------------

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानCode of conductआचारसंहिता