शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार दिसली नसती- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 20:56 IST

पुण्यात भाजपाने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही.

पुणेः पुण्यात भाजपाने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यात शिवसेना दिसत नाही, नाशिक आणि पुण्यासारख्या शहरात जागा देत नाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार म्हणून भाजपाबरोबर युती केली, भाजपा शिवसेनेला मान देत नाही, तरी युती का?, माननीय बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार नसती. आज असं करायची कोणाची हिंमत झाली नसती, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला आहे. ते कसब्यातील सभेत बोलत होते. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का?, असं म्हणत राज ठाकरेंनी राधाकृष्ण विखे-पाटलांनाही खडे बोल सुनावले आहेत. मला विरोधासाठी विरोध करण्याचं काम करायचं नाही. बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो. ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे की, 'माझी नोकरी कधीही जाऊ शकते'. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. इतिहास शालेय पुस्तकांमध्ये सांगितला जात नाही. स्मारक तयार करण्याच्या घोषणा केल्या जातात. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला, पण अद्याप शिवस्मारक उभारता आले नाही. स्मारकाचे केवळ राजकारण केले जाते. स्मारक तयार करण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खर्च करण्याची आवश्यकता आहे. सिंचन झालेले नाही. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देश मागे आला. सोशल मीडियामुळे देशात काय वातावरण आहे हे कळतं. देशात सध्या भीषण परिस्थिती आहे. नोटाबंदी फसली तर देश खचेल असं मी म्हणालो होतो, याची आठवणही राज ठाकरेंनी करून दिली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019