शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:18 IST

जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे.

ठळक मुद्दे शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?

- युगंधर ताजणे - प्रत्यक्षात मतदानाकरिता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उमेदवारांनी आता प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला असून, घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन ते करताना दिसत आहे. कँटोन्मेंट मतदारसंघात कुणाचा वरचष्मा राहणार याबाबत विविध मते वर्तविली जात असली तरी या भागात विकासकामांना न्याय देणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. अर्थात पूर्वीपासून कॉँग्रेसचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या मुद्यावर मतदारांकडून मतदानाचे दान पदरात पाडून घेणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने धडा शिकवला आहे. यंदाच्या विधानसभेत काँग्रेसचे रमेश बागवे व भाजपचे सुनील कांबळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. यांच्यासह मनसेच्या मनीषा सरोदे, आपकडून खेमदेव सोनवणे, वंचितकडून लक्ष्मण आरडे, एमआयएम पक्षाकडून हीना मोमीन आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत कॉग्रेस व भाजप यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे. कॉँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये केलेला प्रवेश भाजपकरिता कितपत लाभदायी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सुरुवातीला शिवसेना, भाजप, कॉँग्रेस या पक्षांमधील काहींनी बंडखोरी करून निवडणूक लढविण्यचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी माघार घेऊन तडजोड करण्यात समाधान मानले. आतापर्यंत एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी, भाजपकडून चंद्रकांत पाटील, अभिनेता सनी देओल, याशिवाय कॉग्रेस राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवर नेत्यांच्या प्रचारासभा पार पडल्या आहेत. दोन दिवसांनी प्रचाराचा हा धुरळा खाली बसणार आहे. या मतदारसंघातील जलवाहिनीचा, वाहतूककोंडीचा, झोपडपट्टी पुनर्वसन, रोजगार, महिला सक्षमीकरण, वीजपुरवठ्याचे प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने मतदार नेमका कुठला विचार करुन कुणाच्या बाजूने आपला कौल देतात हे सांगणे अवघड आहे. मागील अनेक वर्षांपासून नेतृत्व करणाऱ्यापक्षाने देखील मूलभूत सोयीसुविधांना बगल दिली असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीपुरते फिरकायचे त्यानंतर पुन्हा पाच वर्षे आमदार आणि मतदार यांचा संवादच होत नसल्याचे पाहवयास मिळाले आहे. जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे........ शेट्टींच्या बंडखोरीचा फायदा कुणाला?कॉग्रेसचे माजी नगरसेवक व शहर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे चर्चेला उधाण आले. निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेसकडून बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची भाषा करणाऱ्या शेट्टींचा फायदा नेमका कुणाला होणार, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. त्यांनी कांबळे यांना दिलेला पाठिंबा कितपत यशस्वी ठरणार? हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानPoliticsराजकारण