शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Maharashtra Election 2019 : अखेर भाजपने केले राजी , पुणे शहर रिपाइं होणार प्रचारात सक्रिय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 12:22 IST

‘आम्हाला फसवले’ अशी टीका करून भारतीय जनता पक्षाच्या प्रचारापासून पुण्यात फटकून राहिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) अखेर शहर शाखेने मनवले

ठळक मुद्देकोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेणारपालिकेच्या येत्या निवडणुकीत १५ जागा व अन्य काही आश्वासने

पुणे : ‘आम्हाला फसवले’ अशी टीका करून भारतीय जनता पक्षाच्या प्रचारापासून पुण्यात फटकून राहिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) अखेर भाजपच्या शहर शाखेने मनवले. पालिकेच्या येत्या निवडणुकीत १५ जागा व अन्य काही आश्वासनांवर विसंबून रिपाइंने प्रचारात सक्रिय होण्याचे जाहीर केले. भाजप तसेच रिपाइंच्या वतीने संयुक्तपणे ही माहिती देण्यात आली. भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे तसेच उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर हे रिपाइंचे व उज्ज्वल केसकर हे भाजपचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मिसाळ म्हणाल्या, इतक्या मोठ्या पक्षाने एकही जागा मिळाली नसताना नाराज होणे स्वाभाविक आहे. त्याची दखल घेऊन खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यात पालिकेच्या अडीच वर्षांनंतर होणाºया निवडणुकीत १५ जागा, कोरेगाव भीमा दंगलीतील गुन्हे मागे घेणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यातील स्मारकासाठी ६ एकर जागा उपलब्ध करून द्यावी या मागण्यांचा समावेश आहे.रिपाइंचे शहराध्यक्ष शिरोळे म्हणाले, गेली सलग १२ वर्षे आम्ही भाजपबरोबर आहे. मान्य केले त्यापैकी बरेच काही दिले नाही, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज होते. त्याची दखल घेणे गरजेचे होते. विश्वासात घेतले जात नाही अशी त्यांची तक्रार होती. खासदार बापट यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत आमच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या. पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांनीही प्रचारात भाग घेण्याचे आदेश दिला. कार्यकर्त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यांच्या संमतीवरून आता रिपाइं प्रचारात सहभागी होणार आहे. पक्षाचे प्रत्येक मतदारसंघात हक्काचे असे एकगठ्ठा मतदान आहे. ते भाजपला मिळावेयासाठी रिपाइंचे कार्यकर्ते आता काम करतील.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊन रिपाइंसाठी पुण्यात पालिकेला १५ जागा देण्याचे स्पष्ट आश्वासन भाजपने दिले आहे. त्यावर विश्वास ठेवून प्रचार करणार आहोत.............

घटक पक्ष नाराज नाहीतमिसाळ यांना शिवसेनेच्या नाराजीबाबत विचारले असता त्यांनी, माझ्या मतदारसंघात सर्व शिवसैनिक काम करत आहेत असे सांगितले. अन्य मतदारसंघांत चौकशी करून तेथील शिवसैनिकांनाही सक्रिय करण्यात येईल. घटक पक्षांना आदराने वागवण्याची भाजपची पद्धत आहे. त्यामुळे कोणताही घटक पक्ष नाराज नाही, पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रिय आहेत, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाgirish bapatगिरीष बापटElectionनिवडणूक