शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
5
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
6
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
7
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
8
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
9
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
10
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
12
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
13
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
14
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
15
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
16
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
17
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
18
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
19
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
20
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट

Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये मतदान केंद्रांसाठी २ कोटींचा खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 11:52 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पत्राशेड टाकून १७५ मतदान केंद्रांची निर्मिती

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ५ लाख ४ हजार ४४ मतदार हडपसर विधानसभा मतदारसंघात वृद्ध, अपंग, आजारी मतदारांना देखील सहजरीत्या मतदान केंद्रांत जाऊन मतदान करता येणार

पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघातील पहिला आणि दुसऱ्या मजल्यावरील सर्व मतदान केंद्रे रद्द करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले दिले आहेत. त्यानुसार हडपसर मतदारसंघातील ४५४ मतदान केंद्रांपैकी सुमारे १७५ मतदान केंद्रे शाळा व सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये तात्पुरते पत्र्याचे शेड व पार्टिशन टाकून करण्यात आले आहे. यासाठी तब्बल १ कोटी ९६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून, शेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.वृद्ध, अपंग, आजारी मतदारांना देखील सहजरीत्या मतदान केंद्रांत जाऊन मतदान करता येईल, अशाच ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. हडपसर (२१३) विधानसभा मतदारसंघात अनेक मतदान केंदे्र ही शाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर होती. यामुळे महापालिका किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी आलेल्या मतदारांना अनेक अडचणींना तोड द्यावे लागले. पायºया चढून जाणे शक्य नसलेल्या मतदारांना खुर्च्यांमध्ये बसवून उचलून नेण्याची वेळ अनेक ठिकाणी आली. यासारख्या गैरसोयीमुळे अनेक ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क देखील बजावता आला नाही. यामुळेच निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर घेण्याच आदेश दिले. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ५ लाख ४ हजार ४४ मतदार हडपसर विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्यादेखील मोठी आहे. शाळांची अपूर्ण संख्या लक्षात घेता निवडणूक प्रशासनाला पत्राशेड टाकून मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १ कोटी  ९६ हजार रुपयांचा खर्च आला असून, या खर्चाला शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मान्यता देखील दिली आहे..........पत्राशेडमध्येदेखील अद्ययावत सुविधाकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पत्राशेड टाकून मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. यामध्ये वीज, पाणी, पंखे, आदीसह सर्व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शाळांची मैदाने, सार्वजनिक जागांमध्ये हे शेड उभारण्यात आली आहेत. राज्यात हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पत्राशेड असलेली सर्वांधिक मतदान केंद्र आहेत. आयोगाच्या सूचनेनुसारच हा खर्च करण्यात येत असून, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंदाजपत्रक व पत्राशेडसाठी मंजुरी घेण्यात आली आहे.- भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी, हडपसर...........एकूण मतदार : 5,40,044........एकूण मतदान केंद्रे : 454............एकूण पत्राशेड मतदान केंदे्र :175.....ूएकूण संवेदनशील मतदान केंदे्र :17

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानElectionनिवडणूक