शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांना घरची गुन्हेगारी घालविता आली नाही : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 12:44 IST

मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालता आला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.’’ 

ठळक मुद्देवरवंड येथे सभा, नागपुरात गुन्ह्यांचा उच्चांकभविष्यात लष्कराचे नेतृत्व महिला करतील

दौैंड : ‘‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरची गुन्हेगारी घालवता आलेली नाही, त्यामुळे राज्यातील काय परिस्थिती असेल,’’ असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभेत लगावला. वरवंड (ता. दौंड) येथे राष्ट्रवादीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे आणि ते मूळचे नागपूरचे. मी दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये होतो. तेथील काही लोक मला भेटायला आले होते. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक झाला आहे, अशा तक्रारी केल्या.  मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालता आला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.’’ राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. शेती व्यवसायाला हमीभाव नाही. अशा संकटकालीन परिस्थितीत फडणवीस यांचे शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले नाही. याउलट केंद्रात मी कृषिमंत्री असताना ७१ हजार कोटींची सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. शेतकºयांनी केवळ शेतीव्यवसायावर अवलंबून राहता कामा नये. घरातील एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी कामधंदा किंवा नोकरी बघावी; तरच आर्थिक घडी बसेल आणि शेतकरी आत्महत्येपासून दूर राहतील.केरळमध्ये ६ लाख मराठी बांधव नोकरी करीत आहेत. तेव्हा नोकरीसाठी कुठेही जायची तयारी असेल तर त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असेही पवार म्हणाले. ..........भविष्यात लष्कराचे नेतृत्व महिला करतीलभविष्यात लष्कराचे नेतृत्व महिला करतील, असे शरद पवार यांनी जाहीर भाषणात सूतोवाच केले. महिलांना राजकारणात आणि समाजकारणात समतेच्या तत्त्वावर संधी दिली. भविष्यात महिलांना विविध क्षेत्रांत संधी चालून येणार आहे. या संधीचे सोने महिलांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :daund-acदौंडSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणElectionनिवडणूक