शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Maharashtra Election 2019 : कोथरुडमध्ये प्रचारात भाजपची वरिष्ठ, तर मनसेची कार्यकर्त्यांवर भिस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 13:56 IST

कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला.. परंतु, या निवडणुकीत तो अधिक चर्चिला गेला़...

पुणे : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधूननिवडणूक लढवित असल्याने भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे़. पुण्यात आलेल्या भाजपच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्यांनी कोथरूडमध्ये हजेरी लावून पाटील यांच्या प्रचारात भाग घेतला, तर दुसरीकडे आघाडीने पाठिंबा देऊ केलेल्या मनसेकडून निवडणूक लढविणारे अ‍ॅड. किशोर शिंदे यांची भिस्त सद्य:स्थितीला कार्यकर्त्यांवरच आहे़. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एखादी, तरी सभा कोथरूडमध्ये होईल व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवेल, अशी आशा त्यांना आहे़. कोथरूड  हा भाजपचा बालेकिल्ला; परंतु या निवडणुकीत तो अधिक चर्चिला गेला़. त्याला कारण चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी ठरली असली, तरी सर्वच स्तरावर पाटील यांनी आघाडी घेऊन प्रचारात जोर धरला आहे़. त्यातच चंद्रकांत पाटील मतदार संघात असो वा नसो; पण कोथरूडमधील भाजपचे सर्वच पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने कामास लागल्याचे दिसून येत आहे़. नगरसेवकांनी तर आप-आपल्या कार्यकर्त्यांमार्फत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा चंग बांधला आहे़. नुकतीच झालेली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा असो वा चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठी असो, या प्रत्येक ठिकाणी दुसºया पक्षातील कार्यकर्ते़ पदाधिकारी यांचा भाजप प्रवेश हा पूर्वनियोजितच असतो़. सध्या कोथरूडमधील  ‘इनकमिंग’ ही जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे़. केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन, रवी शंकर, प्रकाश जावडेकर, खासदार नामग्याल आदींच्या सभा म्हणजे पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीची प्रचितीच देत आहेत़. पाटील यांच्यासमोर मनसेचे अ‍ॅड. किशोर शिंदे यांचे आव्हान आहे़. गेल्या निवडणुकांमधील त्यांची लढत लक्षात घेता व या वेळी त्यांना मिळालेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा ते नक्कीच गत मताधिक्यापेक्षा अधिकची मते मिळविणार, हे निश्चित आहे़. परंतु सद्य:स्थितीला मनसेचा कुठलाही नेता किंबहुना मनसेप्रमुख राज ठाकरे तथा आघाडीचे नेते त्यांच्या प्रचारासाठी सरसावले नाहीत़. तरीही अ‍ॅड़ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या दमावर आपल्या प्रचाराला वेग दिला आहे़. जागोजागी निवडणूक कचेºया खोलून मतदारांपर्यंत स्लिपा पोहोचविण्यात मनसेने आघाडी घेतली आहे़. कोथरूडमध्ये बसपाचे प्रवीण थोरात आम आदमी पक्षाचे डॉ़. अभिजित मोरे, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ दीपक शामदिरे, तर प्रजासत्ताक भारत पक्षाचे लक्ष्मण चव्हाण हेही रिंगणात असून, त्यांचाही आपापल्या परीने प्रचार सुरू असून, गाठीभेटी, कोपरासभेवर भर आहे़.

टॅग्स :kothrudकोथरूडkothrud-acकोथरुडElectionनिवडणूकPoliticsराजकारण