शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भाजपा Vs. राष्ट्रवादी Vs. राष्ट्रवादी... पक्ष दोन, पण लढत तिरंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:48 IST

खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीची असलेली जास्त ताकदच तिला घातक ठरली आहे.

ठळक मुद्देबरे झाले रमेश कोंडेंनी माघार घेतली!

विशाल शिर्के 

मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात ग्रामीण मतदार तुलनेने अधिक आहेत. किरकटवाडी, सोनापूर, सांगरून, खेड-शिवापूरचा ग्रामीण भाग आणि धनकवडी, वारजे, नऱ्हे आंबेगाव आणि कोथरूड, सिंहगड रस्त्याचा काही शहरी भाग या मतदारसंघात येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर यांना मतदारांनी दोनदा संधी दिली. या मतदारसंघातील भागावर राष्ट्रवादीचे वर्चव राहिले आहे. आजही आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीचेच अधिक आहेत. खुद्द तापकीर वास्तव्यास असलेल्या वॉर्डमधे तीन नगरसेवक राष्ट्रवादीचेच आहेत.असे असतानाही राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही. राष्ट्रवादीची असलेली जास्त ताकदच तिला घातक ठरली आहे. इतक्या दिवस आपल्या आजूबाजूला असलेली व्यक्ती आपल्या डोक्यावर नको असल्यानेच राष्ट्रवादीला यश मिळालेले नाही.त्या उलट भाजपचे या भागात फारसे अस्तित्व नव्हते. त्यामुळे कोणी कुरघोडी करण्याचा प्रश्नच नाही. तापकीर यांना नगरसेवकाचे तिकीट देण्यातही सुरुवातीला दिवंगत सतीश मिसाळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर तापकीर यांना संधी मिळाली.राष्ट्रवादीने आमदार वांजळे यांच्या पत्नी हर्षदा यांना ऐनवेळी तिकीट दिलेले मतदारांना रुचले नाही. तापकीर विजयी झाले. पुढच्या निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर शहरात आठही जागांवर भाजप आले. मतदारसंघ अजूनही वाहतूककोंडी, मंडई, करमणूक केंद्र, उद्याने, मैदान अशा पारंपरिक प्रश्नातच अडकले आहे. भाजपच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धीच नसल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. भाजपची लढत राष्ट्रवादीशी असली तरी, राष्ट्रवादीची खरी लढत ही पक्षातील नेत्यांशीच आहे.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य २०१४च्या निवडणुकीत याच भागाने घटविले होते. मात्र, २०१९च्या निवडणुकीत  स्थानिकांनी एकदिलाने केलेल्या प्रचारामुळे सुळेंचे मताधिक्य लाखावर गेले. त्याच पद्धतीने पक्ष म्हणून काम केल्यास राष्ट्रवादी भाजपला टक्कर देऊ शकते. तूर्तास, दोन्ही पक्षांनी पदयात्रा, रॅली, सभा आणि प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटींनी वातावरण तयार केले आहे........बरे झाले रमेश कोंडेंनी माघार घेतली!शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे हे खेड-शिवापूर परिसरातील. त्यांचे आप्तेष्ट हे कात्रज, धनकवडी, नºहे आंबेगाव आणि परिसरात राहणारे. त्यांनी या भागात गेली पाच वर्षे सातत्याने संपर्क ठेवला होता. सुख-दु:खाच्या प्रसंगात ते हजर असत. त्यांची बंडखोरी कायम राहिली असती, तर अर्थातच भाजपला फटका बसला असता. त्यांच्या माघारीने भाजपवाले, बरे झाले कोंडेंनी माघार घेतली, असेच म्हणत असतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019khadakwasala-acखडकवासलाPoliticsराजकारणPuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेncp youth double murderराष्ट्रवादी युवक दुहेरी हत्याकांड