शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेचे कसब्यात मनोमिलन नाहीच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:37 IST

विधानसभेची शहरातील एकही जागा दिली नसल्यामुळे नाराज झालेल्या शहर शिवसेनेला बरोबर घेणे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाला अजूनही शक्य झालेले नाही...

ठळक मुद्दे पर्वती मतदारसंघ वगळता शिवसेना प्रचारातून पूर्ण बाजूला

पुणे : विधानसभेची शहरातील एकही जागा दिली नसल्यामुळे नाराज झालेल्या शहर शिवसेनेला बरोबर घेणे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाला अजूनही शक्य झालेले नाही. खासदार गिरीश बापट यांनी रिपाइंबरोबर केली तशीच शिष्टाई शिवसेनेबरोबर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यातच झालेल्या भांडणामुळे अयशस्वी झाला.भाजपच्या विरोधातील सगळा रोष आता त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेतील बंडखोर उमेदवार नगरसेवक विशाल धनवडे यांच्याबरोबर एकवटला असल्याचे दिसते आहे. त्यात खुद्द भाजपतील नाराजांचाही समावेश आहे. नेते छुपेपणाने, तर काही शिवसैनिक उघडपणे धनवडे यांच्याबरोबर फिरताना दिसत आहेत. विजयासाठी त्याचा किती उपयोग होतो, यापेक्षाही भाजपच्या उमेदवाराला मतांमध्ये किती फरक पडतो, अशी चर्चा आहे.भाजपच्या काही मतदारसंघांतील उमेदवारांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत त्यांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात तेथील शिवसेना पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते प्रचारात दिसतात. पर्वती मतदारसंघात हे प्रमाण जास्त आहे. अन्य ठिकाणी मात्र शिवसेना प्रचारातून पूर्ण बाजूला दिसते आहे. शहरप्रमुखपदापासून अचानक बाजूला केलेले माजी आमदार महादेव बाबर यांनी आपण प्रचारात सहभागी होणार नाही, असे जाहीरच केले आहे. 

दुसरे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनीही जवळपास फारकत घेतली आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले शहरप्रमुख संजय मोरे भाजपच्या नेत्यांबरोबर बैठकांना दिसतात, मात्र प्रचारामध्ये शिवसैनिक दिसायला हवेत त्या प्रमाणात दिसत नाहीत............शिवसेना बरोबरच आहेशिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत. ते भाजपबरोबर प्रचारात आहेत. त्यांनी नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र युतीचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी तो मान्य केला असून स्थानिक नेत्यांबरोबर बैठक, चर्चा असे सगळे काही झाले आहे. त्यांची नाराजी नाही.- गिरीश बापट,  खासदार.....समजूत पटली आहेदसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांबरोबर संवाद साधला आहे. नाराजी होती, मात्र ती आता दूर झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात स्थानिक शिवसैनिक भाजप उमेदवाराच्या प्रचारात आहे. त्यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे शिवसेना मागे यात तथ्य नाही.- संजय मोरे, पुणे शहरप्रमुख, शिवसेना

टॅग्स :Puneपुणेkasba-peth-acकसबा पेठShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण